• Download App
    GOOD NEWS : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मराठवाड्याला गिफ्ट! नांदेड-मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण्याच्या सर्वेला मान्यता । GOOD NEWS: Union Minister of State for Railways Raosaheb Danve's gift to Marathwada! Nanded-Manmad broad gauge doubling survey approved

    GOOD NEWS : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मराठवाड्याला गिफ्ट! नांदेड-मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण्याच्या सर्वेला मान्यता

    • आपल्या अधिकारात एकाच कामाची दोन टप्प्यात विभागणी करून निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सदर विषय न जाऊ देता कमी वेळेत कामे पूर्ण करून घेण्यासाठी दानवे यांनी हा निर्णय घेतला. GOOD NEWS: Union Minister of State for Railways Raosaheb Danve’s gift to Marathwada! Nanded-Manmad broad gauge doubling survey approved

    विशेष प्रतिनिधी

    जालना : गेल्या अनेक दिवसापासून नांदेड मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण व्हावे, अशी मागणी राजकीय पक्ष व संघटनातून केली जात होती.  अनेक आंदोलने झाली परंतु या प्रयत्नाला यश आले नाही. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नानंतर अखेर नव्या वर्षाच्या पुर्वसंध्येला मराठवाड्यातील जनतेला गुड न्यूज मिळाली आहे. नांदेड-मनामाड ब्रोडगेजच्या दुहेरीकरणाच्या सर्वेला मान्यता देण्यात आली आहे.

    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच आनंदाची बातमी दिली. प्रत्यक्षात या मार्गावर मालवाहतूक कमी असल्यामुळे दुहेरीकरण नाकारण्यात आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन सदर विषयाबाबत रेल्वे विभागाचा आढावा घेतला.अम्ब्रेला या योजनेअंतर्गत ९८ किलोमीटर दुहेरीकरणाला मान्यता देऊन १७ डिसेंबर २०२१ रोजी सदर दुहेरीकरण्याचा सर्वे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.



    तसेच तातडीने सर्वे पूर्ण करून अंदाजपत्रक विभागाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अम्ब्रेला योजनेत रेल्वेची विविध कामे जसे की रुंदीकरण, दुहेरीकरण व अन्य करण्यास एकत्रितपणे निधी दिला जातो.

    या योजनेत कोणते काम करायचे आहे याचे सर्व अधिकार रेल्वे बोर्डाला असतात. परंतु कामाची रक्कम एक हजार कोटी पेक्षा कमी असावी, अशी त्यात अट असते. एक हजार कोटी पेक्षा जास्त खर्च एखाद्या प्रकल्पाला लागत असेल तर त्याकरिता विभागाला निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सदर विषय न्यावा लागतो.

    म्हणून नांदेड-मनमाड दुहेरीकरणाच्या कामाला दानवे यांनी निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर न जाऊ देता अम्ब्रेला योजनेअंतर्गत या कामाला रेल्वे बोर्डाकडून मान्यात मिळवून दिली. त्यानुसार सर्वेचे काम सुरू करण्याचे आदेश देखील संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त शिल्लक असलेले मार्ग दुसऱ्या टप्प्यात या अम्ब्रेला योजनेअंतर्गत घेऊन पूर्ण करण्याचे नियोजन देखील दानवे यांनी केल्याचे सांगितले. यामुळे मराठवाड्यातील नांदेड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

    GOOD NEWS : Union Minister of State for Railways Raosaheb Danve’s gift to Marathwada! Nanded-Manmad broad gauge doubling survey approved

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!