• Download App
    सुवर्णसंधी! बंपर भरती : स्टेट बँक ऑफ इंडियात तब्बल 5237 जागा ; वाचा सविस्तर ! Golden opportunity ! SBI Clerk Recruitment 2021 

    सुवर्णसंधी : बंपर भरती : स्टेट बँक ऑफ इंडियात तब्बल ५२३७ जागा ; वाचा सविस्तर

    महत्वाच्या तारखा…
    अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 27 एप्रिल 2021
    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 मे 2021
    परिक्षा पूर्व ट्रेनिंग कॉल लेटर – 26 मे 2021
    प्रीलिमिनरी परिक्षा – जून 2021
    मुख्य परिक्षा – 31 जुलै, 2021


    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती काढली आहे. एसबीआयने क्लार्कच्या 5237 पदांवर भरती जाहिर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. Golden opportunity ! SBI Clerk Recruitment 2021

    एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर याची माहिती आहे. यामध्ये ज्युनिअर असोसिएट या जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क भरती 2021 नुसार ज्युनिअर असोसिएटच्या 5237 जागा भरल्या जाणार आहेत.

    या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 मे 2021 आहे.

    शैक्षणिक अर्हता 

    कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे 01 जानेवारी 2021 च्या आधीचे integrated dual degree (IDD) प्रमाणपत्र आहे ते अर्ज करू शकतात. तसेच जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, ते अर्ज करू शकतात

    वेतन (Pay Scale)
    Rs 17,900/- to 47,920/-

    वयोमर्यादा

    एसबीआय भरतीला वयाची अट 1 एप्रिल 2021 नुसार कमीत कमी 20 आणि जास्तितजास्त 28 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच आरक्षणानुसार वयाची अट शिथिल केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन पहावे लागणार आहे.

    निवड प्रक्रिया

    सुरुवातीला एक ऑनलाईन आणि नंतर मुख्य परिक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक भाषेची निवड करता येणार आहे. 100 अंकांची पहिली परिक्षा असणार आहे. एक तासाची ही परिक्षा असणार असून इंग्रजी, गणित आणि तर्क क्षमतेवर आधारित असणार आहे.

    अर्ज शुल्क

    भरतीचे अर्ज शुल्क सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आरक्षणातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
    750/- For Gen / OBC / EWS
    Nil – For SC / ST / XS / DXS

     

    Golden opportunity ! SBI Clerk Recruitment 2021

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती