• Download App
    गोल्डन बॉय नीरज चोप्राला प्रजासत्ताक दिनी परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणारGolden Boy Neeraj Chopra to be honored with Distinguished Service Medal on Republic Day

    गोल्डन बॉय नीरज चोप्राला प्रजासत्ताक दिनी परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार

    नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.Golden Boy Neeraj Chopra to be honored with Distinguished Service Medal on Republic Day


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ३८४ जणांना शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

    ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते हे शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.याच यादीत नीरज चोप्रालाही स्थान मिळाले आहे.ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे.



    त्याआधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकच्या अंतिम स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले होते.

    नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

    दरम्यान पुरस्कारांमध्ये १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदके, ४ उत्तम युद्ध सेवा पदके, ५३ अति विशिष्ट सेवा पदके, १३ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत पाच मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत.

    Golden Boy Neeraj Chopra to be honored with Distinguished Service Medal on Republic Day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!