• Download App
    देवा, ठाकरे - पवार सरकारला बुद्धी दे, एसटीच्या कर्मचाऱ्यांची सामूहिक प्रार्थना ; विलिनीकरणाचा निर्णय लवकर होण्यासाठी साकडे । God, Give wisdom to the Thackeray - Pawar government : St empolyes

    देवा, ठाकरे – पवार सरकारला बुद्धी दे, एसटीच्या कर्मचाऱ्यांची सामूहिक प्रार्थना ; विलिनीकरणाचा निर्णय लवकर होण्यासाठी साकडे

    विशेष प्रतिनिधी

    बीड : एसटी कर्मचारी आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. आज बीडच्या एसटी आगारातील विविध समाज बांधवांनी एकत्र येत आपलं गाऱ्हाणं मांडले आहे. देवा ठाकरे – पवार सरकारला एसटीच्या विलीनीकरणासाठी बुद्धी दे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. God, Give wisdom to the Thackeray – Pawar government : St empolyes

    बीड आगारातील एसटी कर्मचारी मागील पंधरा दिवसांपासून आंदोलन करत आहे. दररोज आंदोलन करत हे कर्मचारी शासन दरबारी म्हणणं पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुवारी मात्र आंदोलनाला भावनिकतेची जोड देत सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

    हिंदू बांधवांनी लक्ष्मी पूजन, भागवत गीता वाचन करून विधिवत पूजा केली. मुस्लिम बांधवांनी दुआ अदा केली, तर बौद्ध धर्मियांनी बुद्धवंदना केली. सरकारने गांभीर्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजावून घेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा एकही कर्मचारी सेवेत रुजू होणार नाही. असे पुन्हा कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

    • देवा, ठाकरे – पवार सरकारला बुद्धी दे
    • एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय लवकर होऊ दे
    • हिंदू, मुस्लिम, बुद्ध समुदायाकडून सामूहिक प्रार्थना
    • हिंदू बांधवांचे लक्ष्मी पूजन, भागवत गीता वाचन
    • मुस्लिम बांधवांकडून दुआ अदा
    • बौद्ध धर्मियांनी बुद्धवंदना
    • विलीनीकरणाचा आग्रह, देवाला घातले साकडे

    God, Give wisdom to the Thackeray – Pawar government : St empolyes+

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!