• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांना "बेस्ट" सारखाच दिवाळी बोनस द्या; मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदनGive ST employees same Diwali bonus as BEST

    एसटी कर्मचाऱ्यांना “बेस्ट” सारखाच दिवाळी बोनस द्या; मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन

    प्रतिनिधी

    मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र वर्कर्स कॉंग्रेसने करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांच्यात वाढ करून तो ३४ टक्क्यांपर्यंत करावा आणि दिवाळीपूर्वी थकबाकी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. Give ST employees same Diwali bonus as BEST

    बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा झालेली आहे. परंतु राज्याची मुख्य सार्वजनिक वाहतूक असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी अद्याप दिवाळी बोनस जाहीर झालेला नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ बोनस जाहीर करावा अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    एसटी वर्कर्सच्या मागण्या

    • एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, वेतन, भत्ते, सेवा सवलती लागू कराव्यात.
    • शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करून दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम द्यावी.
    • घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी.
    • एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा ३६० कोटी रुपये देऊन वेतन देय तारखेस द्यावे.
    • एसटीच्या आर्थिक बाबींबाबत महामंडळासोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

    Give ST employees same Diwali bonus as BEST

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना