वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवड : “प्लॅस्टिक बाटली द्या, चहा-वडापाव खा”, असा अनोखा उपक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यासाठी राबवण्याची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत काही ठिकाणच्या वडापावविक्रेत्यांकडे प्लॅस्टीकच्या बाटल्या देणाऱ्यास चहा आणि वडापाव मोफत खाण्यास मिळणार आहे. Give plastic bottles, eat tea-vadapav for free; Initiatives for plastic removal in Pimpri-Chinchwad
विक्रेत्यांना चहा आणि वडापावची रक्कम पिंपरी चिंचवड महापालिका देणार आहे. या उपक्रमामुळे विक्रेते आणि ग्राहक प्लॅस्टिक मुक्तीला हातभार लावणार आहेत.विक्रेत्यांकडून नोंदणी होताच हा उपक्रम प्रत्यक्षात सुरु होईल.
ग्राहकांनी विक्रेत्यांना ५ प्लॅस्टिक बाटल्या दिल्यानंतर एक कप चहा आणि १०प्लॅस्टिक बाटल्या दिल्यावर एक वडापाव मिळणार आहे. या बाटल्या विक्रेत्यांनी महापालिकेला द्यायच्या आहेत. त्या मोबदल्यात महापालिका विक्रेत्यांना एक कप चहासाठी १० रुपये आणि एक वडापावचे १५ रुपये देणार आहे.
Give plastic bottles, eat tea-vadapav for free; Initiatives for plastic removal in Pimpri-Chinchwad
महत्त्वाच्या बातम्या
- ELECTION EXPENSES : निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली ! लोकसभेसाठी 95 लाख तर विधानसभेसाठी 40 लाख
- थिएटर कधी बंद करायचे हे तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेवर अवलंबून – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
- केंद्र सरकार लवकरच भारतीयांना ई-पासपोर्ट उपलब्ध करून देणार
- किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षा सलग दुसऱ्या वेळा कोरोना संक्रमणामुळे पुन्हा स्थगित