विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगावातले दोन भाऊ; ठाणे – बुधवारात जाऊन “धुणी धुऊ”!! अशी मराठी म्हणून सध्या जळगावात गाजते आहे. Girishbhau to be send in Pune’s Budhwar Peth, not me to Thane; Eknath Khadse
भाजप मध्ये भांडण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेले नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ आणि भाजपचे विद्यमान आमदार माजी मंत्री गिरीश महाजन उर्फ गिरीशभाऊ यांच्यातला भात वाद गाजतो आहे. या दोघांचे राजकारण उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. पण त्यांनी आपले जळगावातील राजकीय भांडणाची धुणीभांडी ठाणे आणि पुण्यातली बुधवार पेठ इथे नेऊन धुवायला सुरुवात केली आहे …!!
गिरीशभाऊंनी नाथाभाऊंना ठाण्यात उपचार करून घ्या म्हणजे ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात जाऊन उपचार करून घ्या, असा सल्ला दिला. त्यावर नाथाभाऊंनी गिरीशभाऊंना पुण्याची बुधवार पेठ दाखवा म्हणजे पुण्याचा रेड लाइट एरिया दाखवा, असे प्रत्युत्तर दिले. यावर गिरीशभाऊंनी आता पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर देखील आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे.
एकूण या दोन्ही नेत्यांचे राजकारण उत्तर महाराष्ट्रात त्यातही जळगाव जिल्ह्यापुरते मर्यादित असताना त्यांनी आपले राजकीय भांडण जळगाव जिल्ह्याबाहेर नेले आहे. नाथाभाऊंनी आणि गिरीशभाऊंनी ठाण्याचे वेड्यांचे इस्पितळ आणि पुण्याची बुधवार पेठ इथे राजकीय भांडणांची धुणी धुवायला सुरुवात केली आहे…!! यापुढे हे दोन्ही नेते जळगाव सोडून आणखीन कुठे – कुठे नेऊन आपल्या राजकीय भांडणाची धुणीभांडी धुतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे…!!
Girishbhau to be send in Pune’s Budhwar Peth, not me to Thane; Eknath Khadse
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या माहितीसाठी हेल्पलाईन सुरू
- आशिष शेलार यांना धमकी देणारा ओसामा खान याला पोलिसांनी केली अटक
- मला अटक केल्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अभिनेत्याची पोलीसांनाच धमकी
- नागरिकांच्या संतापानंतर राज्य सरकारचे एक पाऊल मागे, जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे