• Download App
    गौतम अदानी बनले आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ; संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ । Gautam Adani became the second richest man in Asia; 3.15 lakh crore increase in assets

    गौतम अदानी बनले आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ; संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ झाली आहे. Gautam Adani became the second richest man in Asia; 3.15 lakh crore increase in assets
    गौतम अदानी यांना २०२१ हे वर्ष फायदेशीर ठरले आहे. अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत तब्बल ४३ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३.१५ लाख कोटी रूपयांची वाढ झाली.



    ब्लूमबर्गच्या माहितीनुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ७६.७ बिलियन डॉलर्स म्हणजेच ५.६० लाख कोटी रूपये झाली . त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांची संपत्ती वाढली आहे शेअर्समध्ये यावर्षी ३३० टक्क्यांची वाढ झाली. तर अदानी एंटरप्रयजेसच्या शेअर्समध्ये २३५ टक्क्यांची वाढ झाली. अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये तब्बल २६३ टक्क्यांची वाढ झाली.

    रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आणि बर्कशायर हॅथवेचे मालक वॉरेन बफे यांच्यापेक्षाही अदानी यांच्या संपत्ती वेगाने वाढली आहे, असे बाजारातील तज्ज्ञानी सांगितले.

    Gautam Adani became the second richest man in Asia; 3.15 lakh crore increase in assets

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार