• Download App
    गौतम अदानींना मोठा धक्का : अदानींचे शेअर कोसळले, सहापैकी चार कंपन्यांमध्ये लोअर सर्किट । Gautam Adani 4 Companies In Lower Circuit Share Fall Sharply After News Of Sebi Investigation

    अदानी समूहाच्या सेबीकडून चौकशीच्या चर्चांमुळे कंपन्यांचे शेअर्स कोसळले, सहापैकी चार कंपन्यांमध्ये लोअर सर्किट

    Gautam Adani 4 Companies In Lower Circuit : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. सोमवारी अशी माहिती मिळाली होती की रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळ (सेबी) अदानी समूहाच्या काही कंपन्यांची चौकशी करत आहेत. तर अदानी समूहाने अहमदाबादमध्ये एक निवेदन जारी केले आहे त्यानुसार, सेबीकडून अशात त्यांना कोणतीही नोटीस मिळालेली नाही. राहिला प्रश्न डीआरआयच्या कारणे दाखवा नोटिशीचा तर ते पाच वर्षांपूर्वीच त्यांना देण्यात आले होते. कंपनीच्या प्रवक्त्याने सोमवारी सेबी आणि समूह कंपन्यांच्या कस्टम विभागाने केलेल्या तपासणीच्या वृत्तांवर स्पष्टीकरण देताना असे सांगितले गेले. Gautam Adani 4 Companies In Lower Circuit Share Fall Sharply After News Of Sebi Investigation


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. सोमवारी अशी माहिती मिळाली होती की रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळ (सेबी) अदानी समूहाच्या काही कंपन्यांची चौकशी करत आहेत. तर अदानी समूहाने अहमदाबादमध्ये एक निवेदन जारी केले आहे त्यानुसार, सेबीकडून अशात त्यांना कोणतीही नोटीस मिळालेली नाही. राहिला प्रश्न डीआरआयच्या कारणे दाखवा नोटिशीचा तर ते पाच वर्षांपूर्वीच त्यांना देण्यात आले होते. कंपनीच्या प्रवक्त्याने सोमवारी सेबी आणि समूह कंपन्यांच्या कस्टम विभागाने केलेल्या तपासणीच्या वृत्तांवर स्पष्टीकरण देताना असे सांगितले गेले.

    सहा पैकी चार कंपन्यांमध्ये लोअर सर्किट

    यादरम्यान गौतम अदानीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट दिसून आली. मंगळवारी शेअर बाजार सुरू होताच अदानींच्या सहा कंपन्यांपैकी तीन कंपन्यांना लोअर सर्किट लागले आणि काही मिनिटांच्या व्यवहारानंतर त्यांच्या आणखी एका कंपनीने लोअर सर्किटच्या पातळीला स्पर्श केला. इतर दोन कंपन्यांचीही घसरण सुरूच आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस लिमिटेड, अदानी ग्रीन आणि अदानी पॉवरचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत.

    अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात माहिती दिली

    वस्तुतः सोमवारी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात अदानी समूहाबद्दल चर्चा केली. चौधरी म्हणाले की, डीआरआय आणि सेबी अदानी समूहाच्या काही कंपन्यांची चौकशी करत आहेत. ही चौकशी सेबीच्या नियमन संबंधित आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणताही तपास केला जात नाही. ते म्हणाले होते की, परकीय पोर्टफोलियो गुंतवणुकीची होल्डिंग अदानी समूहाच्या शेअर्समध्ये डे-टू-डे ट्रेडिंगच्या आधारे आहे. दरम्यान, अदानी समूहाने स्पष्टीकरण दिले की, अशात त्यांना सेबीचे कोणतेही पत्र मिळालेले नाही. तर डीआरआय नोटीस पाच वर्षे जुनी आहे.

    Gautam Adani 4 Companies In Lower Circuit Share Fall Sharply After News Of Sebi Investigation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य