• Download App
    मुंबई वगळता राज्यात गरब्याला परवानगी; कोरोना नियमांचे पालन करण्याची अट लागूGarba allowed in maharashtra except in mumbai

    मुंबई वगळता राज्यात गरब्याला परवानगी; कोरोना नियमांचे पालन करण्याची अट लागू

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्र वगळता राज्यभरात नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. मात्र त्यासाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. Garba allowed in maharashtra except in mumbai

    मुंबई महापालिकेच्य क्षेत्रात गरबाला बंदी आली. पण, पण सांस्कृतिक खात्याने राज्यात अन्य ठिकाणी गरबा खेळण्यास परवानगी दिल्याचे टोपे यांनी सांगितले. मोकळ्या मैदानांवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग चे नियम आयोजकांनी पाळावेत. बंदिस्त सभागृह, हॉलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश देण्याची अट राहील. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आयोजक व हॉल मालकांची राहील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

    नवरात्रोत्सवात मंदिरे खुली होणार आहेत. आता गरबा खेळण्यासही परवानगी मिळाल्याने यंदा नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा होईल. मात्र गरबा खेळण्याची परवानगी मुंबईतही मिळावी, अशी मागणी होत आहे. मुंबईबाबतच भेदभाव का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अटी-शर्ती व नियमांचे पालन करून मुंबईतही गरबा खेळण्यास परवानगी मिळाली, अशी मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.

    Garba allowed in maharashtra except in mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nilesh Ghaywal’ : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द होणार, बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचे उघड

    Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणाले- दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता लागू होईल, निवडणुकीच्या तयारीला लागू या

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून हिरवी चादर ओढली, त्यांचा रॅडिकल इस्लामिक विचारांना बळ देण्याचा प्रयत्न, अमित साटमांचे आरोप