• Download App
    धोतरं कसली पेटवताय??; "या"वरून महाराष्ट्र पेटला पाहिजे; मानपाड्यात ३० जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार|Gangrape on minor in manpada dombivli

    धोतरं कसली पेटवताय??; “या”वरून महाराष्ट्र पेटला पाहिजे; मानपाड्यात ३० जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यपालांचे धोतर पेटवायला निघालेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात महिला किती असुरक्षित आहेत हे उघड्यावर आणणारा एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार डोंबिवलीच्या मानपाडा इथं घडला आहे.Gangrape on minor in manpada dombivli

    डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.



    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

    Gangrape on minor in manpada dombivli

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!