• Download App
    गणेशोत्सव स्पेशल : 3500 गाड्या फुल्ल!!; तब्बल दीड लाख प्रवाशांचे कोकणासाठी एसटी गाड्यांचे आरक्षण!!Ganeshotsav Special: 3500 cars full

    गणेशोत्सव स्पेशल : 3500 गाड्या फुल्ल!!; तब्बल दीड लाख प्रवाशांचे कोकणासाठी एसटी गाड्यांचे आरक्षण!!

    प्रतिनिधी

    मुंबई/पुणे : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी तब्बल १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य मिळाले आहे. या सर्व गाड्यांमधून जवळपास दीड लाख गणेशभक्त कोकणात जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. Ganeshotsav Special: 3500 cars full

    कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जात आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २ हजार ५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत तब्बल ३४१४ गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. या गाड्यांमधून सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत. , असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या लालपरीला सुरक्षित प्रवास म्हणून प्राधान्य दिल्याने चन्ने यांनी चाकरमान्यांचे आभार मानले.

    सुरक्षित प्रवावासाठी विशेष खबरदारी

    गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.

    Ganeshotsav Special: 3500 cars full

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा