प्रतिनिधी
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या एकमेकांच्या घरी गणेश दर्शनाच्या भेटीगाठी सुरू असताना केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबईत आधी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना खासगीरीत्या भेटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत निवासस्थान “वर्षा”वर जाऊन त्यांनी गणेश दर्शन घेतले. त्यामुळे अजित डोहाल यांच्यासारखे केंद्रातले एवढे महत्त्वाचे अधिकारी महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या मिशनवर आले आहेत??, याची चर्चा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Ganesha Darshan to Chief Minister Eknath Shinde after Governor’s visit ajit dowal
अजित डोवाल यांच्यासारखे नेते सहसा एखाद्या राज्यात जाऊन राज्यपाल अथवा मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे फारसे घडत नाही. अजित डोवालांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा रोल थेट केंद्र सरकारशी संबंधित आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवात जेव्हा महाराष्ट्रातल्या विविध नेत्यांच्या एकमेकांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेणे आणि त्या निमित्ताने (न)राजकीय चर्चा करणे असा सिलसिला सुरू असताना अजित डोवाल यांनी आधी राज्यपालांची भेट घेणे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारी निवासस्थान “वर्षा”वर जाऊन गणेश दर्शन घेणे याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेत्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले आहे. अनेक नेते त्यांच्या घरी देखील दर्शनाला आले आहेत. यात प्रामुख्याने मनोहर जोशी, नारायण राणे, राज ठाकरे या नेत्यांचा समावेश आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी गणेशोत्सवाच्या काळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
या राजकीय पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांच्यासारखे अति वरिष्ठ आणि महत्त्वाचे अधिकारी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईत येऊन भेट घेतात याचा अर्थ लावण्याचे काम अनेक पातळ्यांवर सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित डोवाल यांचे वर्षा बंगल्यावर पुष्पगुच्छ देत आणि शाल घालून स्वागत केले आहे. अजित डोवाल यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात नेमके काय शिजणार आहे आणि नंतर कोणत्या राजकारणाला उकळी फुटणार आहे??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ganesha Darshan to Chief Minister Eknath Shinde after Governor’s visit ajit dowal
महत्वाच्या बातम्या
- मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षात बंड : जेडीयूचे 6 पैकी 5 आमदार भाजपमध्ये दाखल, एनडीए सोडण्याच्या निर्णयावर नाराज
- सुप्रीम कोर्टाकडून तिस्ता यांना तात्पुरता जामीन : गुजरात सरकारने जामिनाला केला होता विरोध, प्रतिज्ञापत्रही दाखल
- भाजप अध्यक्ष नड्डांनी दाखवला काँग्रेसला आरसा : म्हणाले- आधी पक्ष जोडा, नंतर ‘भारत जोडो’बद्दल बोला
- Nifty50 : आता अदानींची ही कंपनी निफ्टी50 मध्ये, श्री सिमेंट झाली बाहेरb