• Download App
    Ganesh Ustav 2021:ऑलम्पिक विजेत्त्यांसह अवतरले बाप्पा ! सुबोध भावेची आगळी वेगळी कल्पना ; शेअर केले फोटो । Ganesh Ustav 2021: Bappa with Olympic winners! Subodh Bhave's very different idea; Shared photos

    Ganesh Ustav 2021:ऑलम्पिक विजेत्त्यांसह अवतरले बाप्पा ! सुबोध भावेची आगळी वेगळी कल्पना ; शेअर केले फोटो

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गणरायाला सर्वांचं लाडकं दैवत म्हणून ओळखलं जात त्याच्या येण्याने सर्व विघ्न दूर होतात म्हणूनच त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात.खेळ असो वा अन्य काही सर्वांमध्ये मेहनतीसोबत बुद्धीचा वापर केल्याने हमखास यशप्राप्ती होते. म्हणून तर यावर्षी ऑलम्पिकमध्ये आपल्या लाडक्या खेळाडूंनी पदक जिंकत आपली छाती अभिमानाने फुलवली आहे. म्हणून या खेळाडूंना सन्मान देत अभिनेता सुबोध भावेने बाप्पाची आरास सजवली आहे. Ganesh Ustav 2021: Bappa with Olympic winners! Subodh Bhave’s very different idea; Shared photos

    १० सप्टेंबरपासून यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी अगदी उत्साहात बाप्पाचं आगमन झालं आहे. सर्वांनी बाप्पाच्या येण्याआधीच तयारीला सुरुवात केली होती.



    यामध्ये कलाकारांचासुद्धा समावेश आहे. अभिनेता सुबोध भावेच्या बाप्पाची आरास यावेळी खूपच खास आहे. सुबोधने आपलं दैवत आणि आपल्या देशाचा अभिमान एकत्र आणला आहे. अभिनेता सुबोध भावेनं आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या घरच्या बाप्पाचा फोटो शेयर केला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

    यामध्ये बाप्पाची आरास अगदी खास आणि वेगळी दिसत आहे. कारण सुबोधने आपल्या लाडक्या गणरायाची आरास यावर्षीच्या ऑलम्पिक खेळाडूंच्या छायाचित्रांनी सजवली आहे. नीरज चोप्रापासून इतर सर्वच खेळाडू या आरासमध्ये असलेले दिसत आहेत. बाप्पाची हि आरासपाहून कोणालाही अभिमान वाटावा अशीच आहे.

    सुबोध भावेने शेयर केलेल्या या फोटोवर प्रचंड कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. सर्जन सुबोधच्या या आगळ्या वेगळ्या कल्पनेचं तोंडभरून कौतुक करत आहेत. तसेच त्याला शुभेच्छादेखील देत आहेत. सुबोधनेसुद्धा आपल्या लाडक्या बाप्पासोबत फोटो शेयर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    Ganesh Ustav 2021: Bappa with Olympic winners! Subodh Bhave’s very different idea; Shared photos

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!