विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिंधूदूर्ग जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतील वादामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत त्यासाठी जबाबदार आहेत. सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचा पराभव झाल्यावर नितेश राणे यांनी एकाच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Gadlach … Nitesh Rane’s reaction in one word after Sindhudurg District Bank election
गाडलाच…असे म्हणत त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये सावंत यांच्यावर नितेश उभे असल्याचा फोटो आहे.संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत.
नॉटरिचेबल असणारे नितेश राणे निकालानंतर सोशल मीडियावर प्रथमच अॅक्टिव्ह झाले.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकासआघाडीला धक्काम मोठा धक्का बसला. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. त्यानंतर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
मात्र, हल्ल्याचा आरोप असलेले भाजपचे मनीष दळवी विजयी झाले आहेत. सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते मिळाली. मात्र, चिठ्ठीद्वारे निकाल विठ्ठल देसाई यांच्या बाजूने लागला.संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नितेश राणे नॉटरिचेबल आहेत.
त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस शोधत आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, ते पोलिसांपुढे आलेले नाहीत. ते अज्ञातस्थळी आहे. मात्र, त्यांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली.
Gadlach … Nitesh Rane’s reaction in one word after Sindhudurg District Bank election
महत्त्वाच्या बातम्या
- गाडलाच…सिंधूदूर्ग जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर नितेश राणे यांची एका शब्दांत प्रतिक्रिया
- कंगना रनौतची मागणी न्यायालयाने फेटाळली, सुनावणी घेणाऱ्या न्यायालयावर भरोसा नसल्याचा केला होता आरोप
- जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे दोन लाखांवर रुग्ण, तिसऱ्या लाटेबाबत दक्षता घेण्याचे आरोग्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
- गोव्याचा वापर राजकीय प्रयोगशाळेप्रमाणे करण्याचा प्रयत्न गोवेकरच हाणून पाडतील, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका