Thursday, 8 May 2025
  • Download App
    Fugitive bookie Anil Jaisinghania's photo with Uddhav Thackeray goes viral

    फरार बुकी अनिल जयसिंघानियाचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल; पण तो नेमका केव्हाचा??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणात अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानिया हिच्या फरार वडिलांसंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अनिल जयसिंघानिया याचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे. Fugitive bookie Anil Jaisinghania’s photo with Uddhav Thackeray goes viral

    डिझायनर अनिक्षा जयसिंघानिया हिने अमृता फडणवीस यांच्याशी ओळख वाढवून नंतर त्यांना खंडणी मागत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी आली. त्याचा खुलासा विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारांनी विधानसभेत मागितला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा देखील केला. या खुलाशातच त्यांनी बुकी अनिल जयसिंघानिया हा गेल्या काही वर्षांपासून फरार असल्याचा उल्लेख केला होता. त्याच्या विरोधात काही गंभीर गुन्हे पोलिसांमध्ये दाखल आहेत आणि अनिक्षा जयसिंघानिया त्याचीच मुलगी आहे. तिने अनिल जयसिंघानिया याला विविध केसेस मधून सोडविण्यासाठीच अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.



    आता याच फरार बुकी अनिल जयसिंघानिया याचा उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो नेमका केव्हाचा आहे?? कारण जर अनिल जयसिंगानिया 2016 पासून फरार असेल, तर तो फोटो त्याच्या आधीचा आहे का??, की त्यानंतरचा?? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    कारण 2016 मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप – शिवसेनेचे सरकार अस्तित्वात होते. तेव्हाही उद्धव ठाकरे हे सत्तारूढ पक्षच होते. शिवसेना अखंड होती आणि 2019 मध्ये ते स्वतःच मुख्यमंत्री होते. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहिले. अनिल जयसिंघानिया याच्याबरोबरचा उद्धव ठाकरे यांचा फोटो त्यांच्या सत्ता काळातला आहे का??, हा प्रश्न आता निर्माण होतो आहे.

    मात्र जो बुकी मूळात फरार आहे, त्याच्याबरोबरचा उद्धव ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    Fugitive bookie Anil Jaisinghania’s photo with Uddhav Thackeray goes viral

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस