एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सध्याच्या परिस्थितीला गंभीर बनू लागला आहे. दरम्यान भाजपाच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला.front at the Ministry for the question of ST workers; BJP MLAs Gopichand Padalkar and Kirit Somaiya arrested
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राज्यातल्या एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सध्याच्या परिस्थितीला गंभीर बनू लागला आहे. दरम्यान भाजपाच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला.
यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली.त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर गोपिचंद पडळकर यांनी आंदोलनाची हाक दिली होती.
दरम्यान, राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
ST कर्मचारी आंदोलन गंभीर स्वरूपाचे होण्याचे कारण म्हणजे न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेलेल असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.
front at the Ministry for the question of ST workers; BJP MLA Gopichand Padalkar and Kirit Somaiya arrested
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE: समीर वानखेडे प्रकरणाचा महाराष्ट्रभर प्रवास ! मुंबई ते औरंगाबाद व्हाया रिसोड ;आता औरंगाबादेत मलिकांविरूद्ध तक्रार
- “द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग”; भारतासाठी नेमका अर्थ काय??
- India China dispute:अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं बळकावल्याचा अमेरिकेचा रिपोर्ट ; भारताने फेटाळला दावा
- AHAMADNAGAR FIRE :अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक