• Download App
    आजपासून अंबाबाई दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवतींना देखील मुभा ; लसीचे दोन डोस बंधनकारकFrom today, pregnant women along with senior citizens will be allowed to visit Ambabai; Two doses of the vaccine are binding

    आजपासून अंबाबाई दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवतींना देखील मुभा ; लसीचे दोन डोस बंधनकारक

    जरी दोन डोस घेतले असेल तरी डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. याचबरोबर या नागरिकांना ई-पास बंधनकारक आहे.From today, pregnant women along with senior citizens will be allowed to visit Ambabai; Two doses of the vaccine are binding


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोरोना संसर्ग वाढल्याने सर्व धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळांवर बंदी घातली होती. हळू हळू हे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.घटस्थापनेच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गर्भवतींना प्रवेशास बंदी होती.

    दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक व गर्भवतींना अंबाबाई मंदिरासह इतर धार्मिक व प्रार्थनास्थळांवर भेट देण्याची मुभा दिली आहे.याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी दिली.



    तसेच जरी दोन डोस घेतले असेल तरी डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. याचबरोबर या नागरिकांना ई-पास बंधनकारक आहे.तसच मास्क, सोशल डिस्टन्सचा वापर, प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनिंग असे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे.तसेच दहा वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेशाबाबत देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने त्यांना दर्शन घेता येणार नाही.

    From today, pregnant women along with senior citizens will be allowed to visit Ambabai ; Two doses of the vaccine are binding

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!