प्रतिनिधी
मुंबई : एखाद्या राजकीय पक्षाच्या दीर्घ वाटचालीत अनेक वळणे वळसे येतात. अनेकदा परस्पर विरोधी भूमिकाही राजकीय पक्षाला घ्याव्या लागतात. याचाच प्रत्यय आज 12 ऑक्टोबर 2022 रोजी आला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात सीपीआयने शिवसेना देईल त्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. From staunch opposition to communists to unconditional support of communists
आज या मूळ शिवसेनेचे नाव जरी बदलून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले असले तरी या शिवसेनेचा राजकीय उगम कट्टर कम्युनिस्ट विरोधातून झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांना कायम विरोध केला होता. शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यातला संघर्ष हा मुंबईच्या राजकीय इतिहासातला फार मोठा भाग आहे कॉम्रेड आमदार कृष्णा देसाई यांची हत्या हा यातला फार महत्त्वाचा घटक होता. पण आता हे सगळे इतिहास जमा झाले आहे आणि कम्युनिस्ट पक्षाने शिवसेना देईल त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबईचे सचिव मिलींद रानडे, वरिष्ठ नेते प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा असेल, असे जाहीर केले आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक येत्या तीन नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटीची तारीख आहे. उमेदवार निवडीवरून राजकीय घडामोडींना वेग आला असताना ‘सीपीआय’ने यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
मुंबईत शिवसेना आणि कम्युनिस्ट असा जुना राजकीय संघर्ष आहे. सत्तरच्या दशकात या दोन संघटनांमधील वाद विकोपाला गेला होता. १९८० च्या नंतर कम्युनिस्टांचा प्रभाव कमी होऊन शिवसेनेचा प्रभाव वाढत गेला. मात्र, शिवसेना व कम्युनिस्टांमध्ये कधीच सख्य नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांना शेवटपर्यंत विरोध केला होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना भेटून कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा महत्वपूर्ण आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने अद्याप मंजूर केला नाही. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत त्या उमेदवार असतील का??, याबाबत अद्याप संभ्रम आहे. तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच छोट्या-मोठ्या गटांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बाजूला भर पडली आहे.
From staunch opposition to communists to unconditional support of communists
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजासाठी चंद्रकांत पाटलांची घोषणा : प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून 15 लाखांपर्यंत व्याज परतावा
- नोटाबंदीच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : कार्यवाहीचे होणार थेट प्रक्षेपण; 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर प्रकरण
- ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा : निवडणूक आयोगाकडे मागितली दाद, अंधेरीत उमेदवार देणार
- मार्क झुकरबर्ग यांचा सोशल मीडिया जाएंट Meta रशियात दहशतवादी म्हणून घोषित