Thursday, 8 May 2025
  • Download App
    1 जूनपासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल : बँकिंग ते सोन्याची हॉलमार्किंगपर्यंत बदलणार नियम, थर्ड पार्टी इन्शुरन्सही महाग|From June 1st these 5 important changes from banking to gold hallmarking rules, third party insurance Will also expensive

    1 जूनपासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल : बँकिंग ते सोन्याची हॉलमार्किंगपर्यंत बदलणार नियम, थर्ड पार्टी इन्शुरन्सही महाग

    प्रतिनिधी

    मुंबई : 1 जूनपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल. म्हणूनच नियमांची माहिती तुमच्याकडे अगोदरच असणे महत्त्वाचे आहे. 1 जूनपासून SBIकडून गृहकर्ज घेणे महाग होणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच 5 बदलांबद्दल सांगत आहोत ज्यांचा तुमच्या खिशावर परिणाम होईल.From June 1st these 5 important changes from banking to gold hallmarking rules, third party insurance Will also expensive

    वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स महागणार

    1 जूनपासून इतर मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. म्हणजेच, आता तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल. दुचाकींच्या बाबतीत 150 सीसी ते 350 सीसी दरम्यानच्या वाहनांसाठी प्रीमियम 1,366 रुपये असेल, तर 350 सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी प्रीमियम 2,804 रुपये असेल.



    SBIकडून गृहकर्ज घेणे महागणार

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या गृहकर्ज बाह्य बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) मध्ये 40 बेसिस पॉइंट्सने 7.05% पर्यंत वाढ केली आहे, तर RLLR 6.65% अधिक क्रेडिट जोखीम प्रीमियम (CRP) असेल. वाढलेले व्याजदर 1 जूनपासून लागू होतील. त्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर वाढतील. पूर्वी EBLR 6.65% होता, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.25% होता.

    गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा

    सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. आता 256 जुन्या जिल्ह्यांव्यतिरिक्त 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे उघडण्यात येणार आहेत. आता या सर्व 288 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग बंधनकारक होणार आहे. आता या जिल्ह्यांमध्ये केवळ 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दागिने विकता येतील. हॉलमार्किंगनंतरच त्यांची विक्री करता येणार आहे.

    अॅक्सिस बँकेच्या बचत खाते नियमांत बदल

    अॅक्सिस बँकेने बचत खात्यावरील सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. याअंतर्गत, निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना 15,000 ऐवजी किमान 25,000 रुपये किंवा अॅक्सिस बँकेच्या सर्व प्रकारच्या बचत खात्यांमध्ये 1 लाख रुपयांची मुदत ठेव ठेवावी लागेल.

    इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत व्यवहार शुल्क

    इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे व्यवहार करणेदेखील जून महिन्यापासून महाग होणार आहे. IPPB ने 15 जूनपासून रोख व्यवहार शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, पहिल्या तीन वेळा पैसे काढणे, रोख ठेव आणि प्रत्येक महिन्याला मिनी स्टेटमेंट घेणे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. विनामूल्य व्यवहारानंतर प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा रोख ठेवीवर 20 रुपये अधिक GST लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर 5 रुपये अधिक GST लागू होईल.

    From June 1st these 5 important changes from banking to gold hallmarking rules, third party insurance Will also expensive

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस