• Download App
    मुंबईत स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो 1 ने प्रवास! Free Metro 1 travel for school students on Independence Day in Mumbai!

    मुंबईत स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो 1 ने प्रवास!

    प्रतिनिधी

    मुंबई : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो १ ला आठ वर्ष पूर्ण झालेली आहे. या आठ वर्षात मुंबई मेट्रोने ७४ कोटी लोकांना सेवा दिली आहे. २ हजार ७७६ दिवस अपघात मुक्त सेवा, प्रवासादरम्यान विविध ऑफर यामुळे मुंबईकरांची मेट्रोला पसंती मिळत आहे. मुंबई मेट्रो १ ने देशभरातील सर्व आगामी मेट्रो मार्गांसाठी एक उच्च बेंचमार्क सेट केला आहे. यंदा स्वातंत्र्यादिनी मुंबई मेट्रोमधून शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. Free Metro 1 travel for school students on Independence Day in Mumbai!

    “आझादी का अमृत महोत्सव” या संकल्पनेनुसार मुंबई मेट्रो वनने १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनी, गणवेश परिधान केलेले शालेय विद्यार्थी पैसे न देता मेट्रोची सफर करू शकतील. या विद्यार्थ्यांना कोणतेही भाडे आकारले जाणार नाही.

    शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो सेवा देण्यासोबतच, मुंबई मेट्रो 1 ने हर घर तिरंगा या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे.

    • मेट्रोमध्ये आयोजित केलेले विविध कार्यक्रम…
    • मेट्रो मुख्यालयात अभिनव कार्यक्रम
    • सर्व १२ मेट्रो स्थानकांवर ध्वजारोहण
    • मेट्रो स्टेशनमधील सर्व डिजिटल स्क्रीनवर स्वातंत्र्याशी संबंधित व्हिडिओ प्रवाशांना दाखवले जातील.
    • सर्व स्थानकांवर तिरंगी फुग्यांची सजावट.

    मुंबई मेट्रो वन भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत सेवा देणार आहे त्यामुळे मेट्रो अलाइनमेंटमध्ये आणि आजूबाजूला राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

    Free Metro 1 travel for school students on Independence Day in Mumbai!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक