कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्या चौघांना विजेचा जोराचा शॉक लागला.Four employees of Praveen Pote’s engineering college died on the spot due to electric shock
विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीत आज धक्कादायक घटना घडली आहे.भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचाऱ्यांना शॉक लागल्याने या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.दरम्यान हेचारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले . हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.दरम्यान या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मृत कर्मचाऱ्यांची नावे
या दुर्देवी घटनेत अक्षय सावरकर (वय 26), प्रशांत शेलोरकर (वय 31), संजय दंडनाईक (वय 45) आणि गोकुळ वाघ (वय 29) अशा चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय घडली
अमरावतीत भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचं पीआर पोटे इंजिनीयरिंग महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य गेटची रंगरंगोटी करत होते.तसेच या मुख्य गेटजवळून हायपॉवरची वायर गेली आहे. दरम्यान हे कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्या चौघांना विजेचा जोराचा शॉक लागला. त्यामुळे हे चारही कर्मचारी शिडीला चिकटले.दरम्यान जोरात झटका बसल्यामुळे हे चारही कर्मचारी खाली कोसळले.यावेळी यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
Four employees of Praveen Pote’s engineering college died on the spot due to electric shock
महत्त्वाच्या बातम्या
- Governor Koshyari letter to CM Thackeray : मुख्यमंत्र्यांची भाषा धमकीवजा, अपमान करणारी, राज्यपालांचं पत्र अखेर समोर आलं
- आरोग्य विम्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, विमा कंपनी मेडिक्लेम नाकारू शकत नाही, कारण… वाचा सविस्तर
- अहमदनगर-बीड-परळी रेल्वेची ६१ किमी स्पीड ट्रायलला सुरुवात, प्रीतम मुंडेंची उपस्थिती, पंकजांनी मोदी- फडणवीसांचे मानले आभार!
- Ludhiana Blast : जर्मनीतून अटक करण्यात आलेल्या जसविंदरचा खुलासा, पाकिस्ताननेच पंजाब निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचाराचा कट रचला