विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळ्यात बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्याची फसवणूक करीत एक कोटींची मागणी केल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादीचा माजी बांधकाम सभापती मंगलदास विठ्ठल बदल यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. वढू खूर्द भागात 2013 आणि त्यानंतरच्या कालावधीत हा प्रकार घडला. न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Former NCP Zilla Parishad office bearer Mangaldas Bandal arrested, Shivajirao Bhosale co-operative bank scam
एका 74 वर्षीय शेतकऱ्याच्या फियार्दीवरून मंगलदास बांदल यांच्यासह पाच जणांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संदिप उत्तमराव भोंडवे (वय 47. लोणीकंद), विकास दामोदर भीडने (वय 43, रा. वडू खुर्द) या दोघांना न्यायालयाने यापूर्वी जामीन दिलेला आहे. आरोपी सचिन पलांडे आणि हनुमंत केमधरे या दोघांचा शोध घेत आहेत.
मंगलदास बांदलसह अन्य आरोपींनी शिवाजीराव भोसले बॅकेतील अधिकाऱ्याशी संगनमत केले. फियार्दींना चारचाकी गाडीत डांबून ठेवत दमदार्टी केली. त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवीत त्यांच्या मालकीची वढू बुद्रुक भागातील 3 हेक्टर 71 आर जमीनीचे गहाणखत जबरदस्तीने करून घेतले.
तसेच 6 कोटी 75 लाख रुपए परस्पर बँकेतून काढून घेतले. तसेच जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी आरोपींनी फियार्दीकडे 1 कोटी रूपयांची मागणी केली. हे पैसे घेऊनही अद्याप बोझा कमी केला नसल्याचे फियार्दीत नमूद करण्यात आलेला आहे.
आरोपींनी फियार्दीच्या नावे बनविलेली कागदपत्रे हस्तगत करायची असून गहाणखत बनवून बँकेकडून घेतलेल्या 6 कोटी 75 लाख रूपयांची विल्हेवाट कशी लावली याचा आरोपीकडे तपास करायचा आहे.
गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर जप्त करणे आदी तपासासाठी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी सहायक सरकरी वकील एड. विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने बांदल याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Former NCP Zilla Parishad office bearer Mangaldas Bandal arrested, Shivajirao Bhosale co-operative bank scam
महत्त्वाच्या बातम्या
- खुशखबर : खाद्य तेलांच्या किमतीत घसरण, जाणून घ्या कोणते तेल किती झाले स्वस्त?
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप
- Kabul Drone Attack : पेंटागॉनने चूक कबूल केली, माफी मागत म्हटले, दहशतवाद्यांऐवजी 10 अफगाण नागरिकांचा जीव गेला