विशेष प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक श्री नारायण शंकर तथा तथा नानासाहेब गर्गे (९१) यांचे निधन झाले. द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब यांची नियुक्ती नाशिक शहर संघचालक म्हणून केल्यावर त्यांनी पंचवीस वर्षे ती जबाबदारी सांभाळली होती. करसल्लागार व्यावसायिक म्हणून त्यांचे चांगले नाव होते. Death of Nanasaheb Garge
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ व दीपक मंडळ यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. त्याकाळात पंचवटीतील तरुण ऐक्य मंडळाकडून खेळणारे ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. मध्यवर्ती हिंदू सैनिकी संस्था (भोसला मिलिटरी स्कूल) च्या व्यवस्थापनात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्यामागे त्यांचे पुत्र करसल्लागार नितीन व उद्योजक निलेश तसेच तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Death of Nanasaheb Garge
महत्त्वाच्या बातम्या
- राफेल विमानांचा वेगवान विक्रम, १२ तासांत कापले १७ हजार किलोमीटरचे अंतर
- पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत : च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेशही अडचणीत, पैसे फिरविण्याचे केले काम
- महाराष्ट्रातील ५ झेडपी निवडणूकांविरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची घोषणा