विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे बेल्जियममधे आहेत असा आरोप आता काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. संजय निरूपम यांनी एक फोटो ट्विट केला आहे आणि त्यासोबतच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेल्जियममधे आहेत असा आरोप केला आहे.Former Mumbai Police Commissioner Parambir Singh in Belgium; Allegation of Sanjay Nirupam
काय आहे संजय निरूपम यांचं ट्विट?
परमबीर सिंग यांचा एक फाईल फोटो संजय निरूपम यांनी ट्विट केला आहे. त्यासोबत ते म्हणतात ‘हे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर हप्तावसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंग पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की ते फरार आहेत.
आता हे समजलं आहे की ते बेल्जियममध्ये आहेत. परमबीर सिंग बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?’ हे प्रश्न संजय निरूपम यांनी विचारले आहेत आणि परमबीर सिंग बेल्जियमला असल्याचा दावा केला आहे.
अँटेलिया प्रकरणात जेव्हा सचिन वाझेचं नाव समोर आलं आणि त्यानेच हा सगळा कट रचल्याचं समोर आलं त्यावेळी म्हणजेच मार्च महिन्यात परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं. पदावरून हटवण्यात आल्यानंतर तीन दिवसातच परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं.
या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून 100 कोटी रूपये वसूल कर असं टार्गेट दिलं होतं असा धक्कादायक आरोप केला.परमबीर सिंग यांनी केलेले हे आरोप त्यावेळी गृहमंत्रीपदावर असलेल्या अनिल देशमुख यांनी फेटाळले. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं.
बॉम्बे हाय कोर्टाने एप्रिल महिन्यात या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच परमबीर सिंग हे सुट्टीवर गेले. तब्बेतीचं कारण देऊन त्यांनी ही सुट्टी घेतली. मात्र तेव्हापासून ते समोर आलेले नाहीत.
Former Mumbai Police Commissioner Parambir Singh in Belgium; Allegation of Sanjay Nirupam
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द