Friday, 9 May 2025
  • Download App
    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन । former mp eknath gaikwad passes away in maharashtra due to covid 19

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

    former mp eknath gaikwad passes away in maharashtra due to covid 19

    Eknath Gaikwad : काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड हे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. former mp eknath gaikwad passes away in maharashtra due to covid 19


     

    मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड हे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

    एकनाथ गायकवाड यांनी माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आपला ठसा उमटवला होता. महाराष्ट्रात काँग्रेसला पुढे नेण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. गायकवाड यांच्या अकाली निधनाने मुंबई काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. काँग्रेससहित अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांनी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एकनाथ गायकवाड यांच्या पार्थिवावर दुपारनंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. अनेक नेतेमंडळींनी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.

    माजी खासदार एकनाथ महादेव गायकवाड यांचा जन्म १ जानेवारी १९४० रोजी साताऱ्यात झाला. त्यांना दोन मुली व दोन मुले आहेत. सर्वप्रथम १९८५-९०, नंतर १९९०-९५ आणि नंतर १९९९-२००४ अशी त्यांची आमदारकीची कारकीर्द राहिली. धारावी मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केल. दरम्यान १९९३ ते ९५ या काळात ते राज्यमंत्री राहिले. यानंतर १९९९ ते २००४ त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण अशी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. २००४ मध्ये त्यांनी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना लोकसभा मतदारसंघात पराभूत केले होते. याशिवाय २०१७ ते २०२० अशी तीन वर्षे त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

    former mp eknath gaikwad passes away in maharashtra due to covid 19

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : पाकिस्तानच्या प्रत्यक्ष सशस्त्र हल्ल्यांपेक्षा फेक न्युजचे हल्ले जास्त, पण भारताचे दोन्ही हल्ल्यांना वेळीच चोख प्रत्युत्तर!!

    IND vs PAK : ‘प्रत्येक हल्ल्याला योग्य उत्तर देऊ…’ जयशंकर यांनी पाकिस्तान हल्ल्यादरम्यान अमेरिका, युरोपियन युनियन आणि इटलीला सांगितले

    Vikram Misri : परराष्ट्र मंत्रालयाची दुसरी पत्रकार परिषद, मिस्री म्हणाले- दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाक सैन्याचे काय काम?