• Download App
    कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या मालकीची, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा । Former MLA Rajesh Kshirsagar's warning to the leaders of Mahavikas Aghadi, owned by Kolhapur North Shiv Sena

    कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या मालकीची, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा

    Kolhapur North Shiv Sena : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेना म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. विरोधकांनी सातत्याने माझी बदनामी केल्यामुळेच गेल्या निवडणुकीत पराभूत झाला. माझा पराभव झाला याचे वाईट वाटले नाही. पण शहराचा विकास थांबला याचे वाईट वाटत असल्याचं माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. Former MLA Rajesh Kshirsagar’s warning to the leaders of Mahavikas Aghadi, owned by Kolhapur North Shiv Sena


    प्रतिनिधी

    कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेना म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. विरोधकांनी सातत्याने माझी बदनामी केल्यामुळेच गेल्या निवडणुकीत पराभूत झाला. माझा पराभव झाला याचे वाईट वाटले नाही. पण शहराचा विकास थांबला याचे वाईट वाटत असल्याचं माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

    मुख्यमंत्री आजारी असताना भाजपकडून टीका केली जाते. राज्यातील संस्कृती भाजपने मोडून काढली आहे. कंगना रनौतला झेड प्लस सुरक्षा पुरवली जाते. अशा पद्धतीने भाजपकडून राजकारण केले जाते, असेही क्षीरसागर म्हणाले.

    गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांचा आदेश नेत्यांनी डावलला. काँग्रेसने आज परिपत्रक काढले आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा संयुक्त लढणार नाही. पण आम्ही पण या मतदारसंघात लढू, कोल्हापूर उत्तर मतदार संघ हा शिवसेनेच्या मालकीचाच आहे. असा ठाम इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

    ते पुढे म्हणाले की, ऐहसान फरामोश माझ्याकडून निघून गेले आहेत. मात्र सामान्य शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय देतील त्यावर आम्ही पुढील दिशा ठरवू असेही क्षीरसागर म्हणाले.

    क्षीरसागर हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. कोल्हापुरात शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केली. त्यानंतर २००७ मध्ये शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावर त्यांची निवड झाली. सन २००९ मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत शिवसेना पश्चिम महाराष्ट्र पक्षप्रतोद म्हणून भूमिका बजावली आहे. अतिशय आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले क्षीरसागर हे भाजपला सतत आव्हान देत असतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान देण्यात ते सतत आघाडीवर असतात.

    Former MLA Rajesh Kshirsagar’s warning to the leaders of Mahavikas Aghadi, owned by Kolhapur North Shiv Sena

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना