विशेष प्रतिनिधी
मुंबई : शंभर कोटी रुपयांची कथित वसुली ज्याला करायचे आदेश दिले होते तेच माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे ईडीचे माफीचे साक्षीदार बनण्यास तयार झाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.Former Home Minister Anil Deshmukh’s feet deep, Sachin Waze ready to witness amnesty
माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार आहे. तसे पत्रच सचिन वाझेकडून सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) देण्यात आले आहे. वाझे यासंदर्भात ईडीकडे 14 फेब्रुवारी रोजी आपले म्हणणे मांडणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात आले. एका प्रतिज्ञापत्रात वाझेने सांगितलं की, त्याने अनिल देशमुख यांच्या निदेर्शानुसारच बारमधून खंडणीची वसुली केली. इतकंच नाही तर अनिल देशमुख यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
देशमुख यांनी आपल्या आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात जबरदस्ती वसूलीच्या खोट्या केसेस दाखल केल्या, असा आरोप वाझे यांनी केला आहे.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दावा केला होता की अनिल देशमुख यांनी वाझेला बार आणि हुक्का पार्लरमधून महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं.
सिंह यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाचा तपास करण्यासाठी जस्टिस के. यू. चांदीवाल कमिटीची स्थापना केली होती.
Former Home Minister Anil Deshmukh’s feet deep, Sachin Waze ready to witness amnesty
महत्त्वाच्या बातम्या
- डीएसके’ फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत
- पंजाबात पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत भाष्य करण्यास मोदींचा नकार, मात्र त्याचवेळी सांगितली पंजाबमधली भावूक आठवण!!
- पाच राज्यांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात उद्या मतदान; काँग्रेस, समाजवादी सह सर्व परिवारवादी पक्षांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!
- पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत