• Download App
    महाबळेश्वर पर्यटनासाठी खास बससेवेला प्रारंभ सातारा एसटी डेपोत नवीन पर्यटन बस दाखल|For Mahabaleshwar Tourism Special bus service started

    महाबळेश्वर पर्यटनासाठी खास बससेवेला प्रारंभ सातारा एसटी डेपोत नवीन पर्यटन बस दाखल

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक अनोखी बस तयार केली आहे. ही पर्यटन बस महाबळेश्वर पर्यटनासाठी वेगळ्या पद्धतीने बनविली आहे.For Mahabaleshwar Tourism Special bus service started

    महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या प्रवाशांना,पर्यटकांना विविध ठिकाणच्या पर्यटनाचा आनंद घेता यावा,यादृष्टीने या बसची बांधणी करण्यात आली आहे . महाबळेश्वर आणि प्रतापगड या भागात ही बस धावणार आहे. सातारा आगारामध्ये ही बस दाखल झाली असून या बसमध्ये ४१ प्रवाशांची आसन क्षमता आहे.



    या बसचे वैशिष्ट्य म्हणजे बसच्या टपाला पूर्णपणे सन रूफ असल्यामुळे पर्यटकांना बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच बसच्या सीट शेजारील असणाऱ्या खिडकीचा काचा देखील वाढवण्यात

    आल्यामुळे ही बस आकर्षक दिसत आहे. मागील वर्षी या बसचा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे या बसमध्ये बदल करून पुन्हा ही बस सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी सज्ज झाली आहे.

    For Mahabaleshwar Tourism Special bus service started

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य

    Raj Thackeray जे बोलले नाहीत, तेच राज ठाकरेंच्या तोंडात घातले; राज ठाकरेंनी टाइम्स सकट मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेचे वाभाडे काढले!!