विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचे विधेयक संसदेत संमत करून घेतल्यानंतर त्यावरून नवाब मलिक, अबू आझमी तसेच उत्तर प्रदेशातील काही नेत्यांच्या जेव्हा जीभा घसरल्या आहेत. या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकापाठोपाठ एक बेछूट आरोप केले आहेत. Following the Nawab series, Abu Azmi also lost his tongue; That said, girls who do not have their own children decide the age of marriage !!
ज्यांची लग्न झालेली नाहीत ते मुलींच्या लग्नाचे वय ठरवत आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर होता. मलिक यांच्या नंतर आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची जीभ घसरली आहे. ज्यांना स्वतःची मुले नाहीत, ते लोक मुलींच्या लग्नाचे वय ठरवत आहेत, असा बेछूट आरोप अबू आझमी यांनी केला आहे. मूळात मुलींच्या लग्नाचे वय वगैरे असे नियमच नकोत. कोणाचे केव्हा लग्न लावून द्यायचे ही ज्याची त्याची कुटुंबे ठरवतील, असे बेताल विधानही त्यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एएमआयएम पक्षाच्या नेत्यांनी तर मुसलमानांची संख्या लोकसंख्या वाढवा तरच ओवैसी साहेब पंतप्रधान होऊ शकतील आणि शफी कुरेशी साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी बेताल वक्तव्ये केली आहेत. मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावर सर्वाधिक प्रतिकूल प्रतिक्रिया भारतातल्या मुस्लीम नेत्यांच्या आल्याचे दिसत आहे.
Following the Nawab series, Abu Azmi also lost his tongue; That said, girls who do not have their own children decide the age of marriage !!
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- जानेवारीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची रुग्ण आढळून येण्याची शक्यता ; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा
- CONGRESS CONTROVERSY : संतापजनक!कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश कुमार सभागृहात म्हणाले -‘बलात्काराचा आनंद घ्या’;सभापतीही हसले ; कॉंग्रेसच्या महिला नेत्या संतापल्या
- आक्रितच, उत्तर कोरियातील नागरिकांना अकरा दिवस हसण्यास बंदी