विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरमधील पंचगंगा नदीमध्ये काल अचानक फेस आढळून आला. बऱ्याच वर्षांमध्ये असे झाल्याचे आढळून आले आहे. ह्या पाण्याचे सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील 20 दिवसांमध्ये हे रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.
Foam was found in Panchganga river
तोपर्यंत आयआयटी पवई मधील एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटमधील तीन तज्ञ पंचगंगा नदीतील पाण्याचे परीक्षण करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
ऋषिकेश हिवरेकर, मोहित धोका, योगेश राऊत असे या पर्यावरण तज्ञांचे नाव आहे. त्यांनी गांधीनगर, काळंबा, वळवडे तालुक्यातील नद्यांच्या पाण्याचे परीक्षण केले आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सीईओ आणि डेप्युटी इंजिनीअर देखील हजर होते.
नवीन रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत झाले ‘ हे ‘बदल ; जाणून घ्या प्रक्रिया
निर्माण झालेली समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी जिल्हा परिषद आपले सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लवकरच नदी किनारी सांडपाणी प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
Foam was found in Panchganga river
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे ‘ ; नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली टीका
- खामगावमध्ये ऑपरेशन वाघ; जमावबंदी, संचारबंदी लागू, नागरी वस्तीत वन विभागाची शोध मोहीम
- भिवंडी : गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला लागली भीषण आग ; अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल
- ओमायक्रॉनचा धसक्याने क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळला; बिटकॉईन १० हजार डॉलरपर्यंत खाली