विशेष प्रतिनिधी
कोल्हापुरात : पावसाचे थैमान सुरु असून गुरुवारी दुपारनंतर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.करवीर तहसीलदारांनी दिले आंबेवाडी चिखली गावाला भेट दिली असून ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या केल्या सूचना केल्या आहेत.Flood in Kolhapur The risk increased
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर ग्रामस्थांत जनावरांसह कौटुंबिक साहित्य घेऊन स्थलांतराला सुरुवात केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोल्हापुर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फुटांवर पोचली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळी नदीची पातळी ३६ फुटावर होती. दुपारनंतर पाणी पातळीत वाढ झाली आहे. आणखी ४ फुटाने पाणी पातळी वाढली तर कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान, सांगली आणि कोल्हापुरात महापुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली
असून ७३ हजार क्युसेक्सने पाणी सध्या सोडले जात आहे. पण, कोल्हापूर आणि सांगली परिसरात पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थितीचा धोका आहे.दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या आणि प्रसंगी स्थलांतरित होण्याच्या इशारा यापूर्वीच दिला आहे.
- कोल्हापुरात पुराचा धोका वाढला
- पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फुटांवर पोचली
- महापुरासाठी आणखी ४ फूट वाढण्याची गरज
- कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडले
- दुपारनंतर ७३ हजार क्युसेकने पाणी सोडले
- सांगली, कोल्हापुरातील पाणी फुगवटा कमी होणार
- नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
- कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचा सल्ला