• Download App
    पंधरा दिवस पुण्यातून विमानांचे उड्डाण होणार नाही; धावपट्टीच्या कामामुळे विमानतळ राहणार बंद । flights from lohgaon airport closed from 16 october

    पंधरा दिवस पुण्यातून विमानांचे उड्डाण होणार नाही; धावपट्टीच्या कामामुळे विमानतळ राहणार बंद

    वृत्तसंस्था

    पुणे : पंधरा दिवस पुण्यातून विमानांचे उड्डाण होणार नाही. धावपट्टीच्या कामामुळे विमानतळ राहणार बंद राहणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस शनिवारपासून (१६ ) सुरुवात झाली आहे. flights from lohgaon airport closed from 16 october

    मागील वर्षी  सप्टेंब मध्ये हवाई दलाने विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा १६ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्यामूळे २९ऑक्टोबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
    दहा दिवसांपूर्वीच लोहगाव विमानतळ बंद राहणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली होती. त्यामळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

    या निर्णयाचा फटका १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तिकिट रिजर्वेशन केलेल्या प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये रात्रीची उड्डणे बंद केली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली होती. आताही तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना तिकिट रिजर्वेशन रद्द करण्यास आणि त्याचा परतावा परत मिळवण्यास मोठी दमछाक करावी लागणार आहे.

    दसऱ्याला ६३ विमानांचे सिमोल्लंघन

    दसऱ्याऱ्याला पुणे विमानतळावरून तब्बल ६३ विमानांची उड्डाणे झाली. यात ९८०३ प्रवासी पुण्याहून दुसऱ्या शहरांत गेले तर ८५२४ प्रवासी पुण्यात दाखल झाले. प्रवासी संख्येचा हा एक विक्रम आहे.

    flights from lohgaon airport closed from 16 october

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : रोहित पवारांचा आरोप- कलाकेंद्रात आमदाराच्या भावाचा गोळीबार; पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

    Bachchu Kadu : बच्चू कडूंचा इशारा- शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू, बँक मॅनेजरला फोनवरून धमकी

    Vijay Vadettiwar हनी ट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवार यांचा आरोप : ५० मंत्री-अधिकाऱ्यांचा समावेश, लोढाकडून २०० कोटींची वसूली