प्रतिनिधी
कोल्हापूर : भारतीय नौदलाने आज आपले निशाण चिन्ह बदलून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा अंकित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. याविषयी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट अशी : Flag of Indian Navy dedicated to Chhatrapati Shivaji Maharaj is a pride for the country
“ज्याचं आरमार त्याचा समुद्र… आरमार हे एक स्वतंत्र राज्यांगच आहे…”
– छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक (Father of Indian Navy) असे म्हटले जाते.
आज भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केरळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्वीचा ब्रिटिशकालीन सेंट जॉर्ज क्रॉस बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रेरणा या नवीन ध्वजात घेण्यात आलेली आहे. ध्वजाच्या एका बाजूला आपला राष्ट्रध्वज तिरंगा असून, त्याच्याच बाजूला भारतीय महाराजांच्या राजमुद्रेच्या आकारात नौदलाचे चिन्ह रेखांकित केले आहे.
भारतीय नौदलाचा हा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !
संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली ही मानवंदनाच आहे. आजचा दिवस हा निश्चितच सर्व देशवासीयांकरिता अभिमानाचा व गौरवाचा दिवस आहे.
– छत्रपती संभाजीराजे
Flag of Indian Navy dedicated to Chhatrapati Shivaji Maharaj is a pride for the country
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव : 4 दिवसांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ पडली 58 मते, भाजपचे वॉकआउट
- GST Collection : गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कर संकलनात 28% वाढ; महाराष्ट्र टॉपवर, 1.44 लाख कोटींचे कलेक्शन
- बुलेट ट्रेन आता महाराष्ट्रात सुसाट; बीकेसीतील 10000 कोटींची जमीन देणार!!
- पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी!!; करा ऑनलाईन अर्ज!!