विशेष प्रतिनिधी
मुंबई : औरंगाबाद येथे सामाजिक न्याय विभागाच्या 11 एकर जागेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक पंचतारांकित शाळा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. Five star school to be set up at Aurangabad ; Announcement of the Department of Social Justice
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विविध योजना, विधानसभा सदस्यांच्या त्यानुरूप असलेल्या मागण्या यासंबंधी विधानसभा सभागृहात आयोजित अनुदान मागण्यांवरील चर्चेला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले.
दरम्यान, सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामास गती देण्यात आली असून, स्वाधार शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती आदी योजनांच्या कक्षा रुंदावल्या असून, यासाठी कुठेही निधीची अडचण भासणार नाही, असेही मुंडे यांनी सांगितले.
मुंडे यांनी विभागामार्फत दिव्यांग, ऊसतोड कामगार, तृतीयपंथीय यांसह विविध लाभार्थी समाज घटकांसाठी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजना व खर्च केलेल्या निधीची माहिती सभागृहाला दिली.
सामाज न्याय विभागातील योजना सर्वसामान्य गरजूंना लाभदायक आहेत. या सर्व योजनांचा बारकाईने अभ्यास करून नावीन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल केल्याने या योजनांचा लाभ खऱ्या गरजू पर्यंत पोहचाव्यात असे नियोजन सामाजिक न्याय विभागाने केली असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
Five star school to be set up at Aurangabad ; Announcement of the Department of Social Justice
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारताची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, सॉफ्टवेअरने वाढवली रेंज
- विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे लंडनच्या तुरुंगात शुभमंगल, स्टेला मॉरिसशी केला विवाह
- काश्मीर पश्नात तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले
- बिरभूम जिल्ह्यातील घटनेबाबत प्रंतप्रधानाची प्रतिक्रिया, अघोरी कृत्य करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही