• Download App
    नाशिकच्या नोट छापण्याच्या कारखान्यातून पाच लाख रुपये गायब, तपास सुरू । five Lakh Rupees Missing From Currency Note Press in Nashik Reports

    नाशिकच्या नोट छापण्याच्या कारखान्यातून पाच लाख रुपये गायब, व्यवस्थापन हादरले, तपास सुरू

    Currency Note Press in Nashik : नाशिकमधील करन्सी नोट प्रेस म्हणजेच नोट छपाई मुद्रणालयातून सुमारे पाच लाख रुपये गायब झाले आहेत. कडेकोट सुरक्षा असलेल्या करन्सी नोट प्रेसमध्ये बंदोबस्तात नोट छपाई सुरू असते. असे असूनही एवढी मोठी रक्कम गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनही हादरले असून या सर्व प्रकाराबाबत लवकरच पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 500 रुपये मूल्य असलेल्या नोटांचे 10 बंडल गायब झाले आहेत. आता नोटांचे हे बंडल खरेच गायब झाले की व्यवस्थापनाच्या नजरचुकीने इतर ठिकाणी गेले, याचा शोध घेण्यात येत आहे. five Lakh Rupees Missing From Currency Note Press in Nashik Reports


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिकमधील करन्सी नोट प्रेस म्हणजेच नोट छपाई मुद्रणालयातून सुमारे पाच लाख रुपये गायब झाले आहेत. कडेकोट सुरक्षा असलेल्या करन्सी नोट प्रेसमध्ये बंदोबस्तात नोट छपाई सुरू असते. असे असूनही एवढी मोठी रक्कम गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनही हादरले असून या सर्व प्रकाराबाबत लवकरच पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 500 रुपये मूल्य असलेल्या नोटांचे 10 बंडल गायब झाले आहेत. आता नोटांचे हे बंडल खरेच गायब झाले की व्यवस्थापनाच्या नजरचुकीने इतर ठिकाणी गेले, याचा शोध घेण्यात येत आहे.

    पाच लाख रुपयांचे बंड गायब असल्याचे दोन आठवड्यांपूर्वी उघडकीस आले होते. याबबत पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नाही. करन्सी नोट प्रेसने या घटनेची अंतर्गत गुप्त चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. तथापि, लवकरच याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल होणार आहे.

    ब्रिटिश अंमलाच्या काळात 1924 मध्ये नाशकात करन्सी नोट प्रेसची स्थापना झाली होती. या छापखान्यात 1925 पासून पोस्टल स्टेशनरी आणि स्टॅम्पची छपाई सुरू आहे. 1928 मध्ये या छापखान्यात पहिल्यांदा चलनी नोट छापण्यात आली. ती पाच रुपयांची नोट होती. 10 फेब्रुवारी 2006 मध्ये सिक्युरिटी प्रिंटिंग मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना करण्यात आली. सध्या ही संस्था केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या कक्षेत काम करते.

    five Lakh Rupees Missing From Currency Note Press in Nashik Reports

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य