Raosaheb Danve office : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पाचही पोलिसांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. राजकीय दबावानंतर ही कारवाई झाल्याचा आरोप करत हे निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना केली होती. पोलिसांचे निलंबन मागे घेतल्याने आता या प्रकरणावरून दानवे-खोतकर वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Five Jalna policemen who raided Raosaheb Danve office are back after Khotkar Meeting With HM Valse Patil
विशेष प्रतिनिधी
जालना : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पाचही पोलिसांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. राजकीय दबावानंतर ही कारवाई झाल्याचा आरोप करत हे निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना केली होती. पोलिसांचे निलंबन मागे घेतल्याने आता या प्रकरणावरून दानवे-खोतकर वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जाफराबादेतील एका स्थानिक पत्रकारावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ दानवेंचे जनसंपर्क कार्यालयावर छापा टाकला व कार्यालायची झडती घेतली, परंतु त्यांच्या हाती काहीही लागलं नाही.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त करत दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सोमवारी उशिरा पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, युवराज पोटरे, मंगलसिंह सोळुंखे, सचिन तिडके आणि शबान तडवी या पाच पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले होते.
या घटनेनंतर जालना पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, राजकीय दबावाला बळी पडून निष्पाप पोलिसांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याची भावना शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे व्यक्त केली होती. त्यांनी पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केली. या मागणीनंतर अखेर त्या पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
Five Jalna policemen who raided Raosaheb Danve office are back after Khotkar Meeting With HM Valse Patil
महत्त्वाच्या बातम्या
- सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरू करणार
- संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुटेरेस यांची फेरनिवड
- इराणच्या अध्यक्षपधी अमेरिकाविरोधी कट्टरतावादी रईसी यांची निवड
- ब्रिटनमध्ये तिसरी लाट , लसीकरणावर जोर ; देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचे डोस
- पायी वारीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही खंडित; मानाच्या दहा पालख्या एसटी बसमधून जाणार