विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो अतिदक्षता विभाग पाहण्यासाठी राजकीय नेत्यांनी गर्दी केली. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. Fire at Ahmednagar District Hospital; Rohit Pawar’s boat to PM Care Ventilator; Jayant Patel pierced his ears !!
रोहित पवारांनी यावेळी अतिदक्षता विभागाची पाहणी केल्यानंतर पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरकडे आगीच्या कारण कारणासाठी बोट दाखविले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी व्हेंटिलेटरमध्ये आग लागून नंतर एसीला आग लागल्याचे सांगितले, असे रोहित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. ही बातमी व्हयरल झाली. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अतिदक्षता विभागला भेट दिली. त्यांचे लक्ष या मुद्द्याकडे वेधले असता त्यांनी देखील व्हेंटिलेटर हा मुद्दा उचलून धरला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र याबद्दल सावध भूमिका घेऊन आगीच्या घटनेची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नाही, असे स्पष्ट केले. रोहित पवार यांनी काय मत व्यक्त केले आहे हे मला माहिती नाही. ते त्यांचे मत असेल. त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन मत व्यक्त केले पाहिजे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी रोहित पवारांचे कान टोचले.
मूळात काल पत्रकार परिषदेमध्ये हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयांना फायर ऑडीट करण्याचे वारंवार आदेश दिले तरी ते का झाले नाही हे माहिती नाही, असे उत्तर दिले होते. दरम्यानच्या काळात रोहित पवार यांनी एम केअर मधील व्हेंटिलेटरकडे बोट दाखविल्याने राजकीय वर्तुळात वाद उत्पन्न झाला. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर त्याची चौकशी आणि त्यावरची कठोर उपाययोजना करण्याऐवजी राजकीय नेते केंद्र-राज्य या वादात उतरल्याचे दिसले. या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी मात्र रोहित पवारांपेक्षा वेगळी भूमिका घेत त्यांचे कान टोचल्याचे मानले जात आहे.
Fire at Ahmednagar District Hospital; Rohit Pawar’s boat to PM Care Ventilator; Jayant Patel pierced his ears !!
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच