माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर 100 कोटीची वसुली करण्याचा आरोप करणारे मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग याना अडकविण्यासाठी आता डाव टाकण्यात आला आहे. त्यांच्या सह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.Fir on Parmbir singh in Akola
विशेष प्रतिनिधी
अकोला :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर 100 कोटीची वसुली करण्याचा आरोप करणारे मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग याना अडकविण्यासाठी आता डाव टाकण्यात आला आहे.
त्यांच्या सह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वयेअन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमवीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
या सोबतच परमवीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त तसेच माजी गृहमंत्र्यांवर १०० कोटींचा हप्ता मगितल्याचा आरोप करणारे परमवीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमवीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश आहे.