विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचा विषय आपल्या पध्दतीने तापवत ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून आपले पुढचे राजकीय टार्गेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्ती मंत्री अनिल परब असतील, हे कालच सूचित केले होते. परंतु, आता उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात नाशिकमध्ये सामनातल्या अग्रलेखाबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. FIR against saamna editor Rashmi Thackeray over abusive language in saamna editorial
सामनातले अग्रलेख जरी संजय राऊत लिहित असले, तरी ते कार्यकारी संपादक आहेत. सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे आहेत. त्यामुळे सामनातल्या सर्व मजकूराची जबाबदारी त्यांची आहे. हे लक्षात घेऊन रश्मी ठाकरे यांच्या विरोधात नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपने परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुरुवातीला लक्ष्य बनवले आहे. ज्या वेळी नारायण राणे यांना अटक होणार होती, तेव्हा अनिल परबांचे पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणाचा विडिओ समोर आला. त्यामध्ये परब हे राणेंना अटक करण्याचे आदेश देताना आढळून आले आहे. त्यामुळे भाजपने राणे यांच्या अटक प्रपकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे परबांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पण त्याच बरोबर दै.सामनामधून नारायण राणे यांच्यावर हीन पातळीवर टीका केल्याने संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांच्या विरोधात नाशिकमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याचाही भाजप पाठपुरावा करणार आहे.
या सर्व घडामोडी लक्षात घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसेना नेते संजय राऊत यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे संजय राऊत हे भुवनेश्वरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईला यायला निघाले आहेत.
अमित शहांनी घेतली माहिती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंची करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईची सविस्तर माहिती घेतली. त्यामुळे आता राज्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेने जसा राणेंच्या अटकेचा विषय हा प्रतिष्ठेचा बनवला, तसा आता महाराष्ट्र भाजपनेही हा विषय प्रतिष्ठेचा बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी राणे यांना भाजपने पाठिंबा दिला आहे आणि अमित शहा याच्यात आता लक्ष घालणार आहेत.
FIR against saamna editor Rashmi Thackeray over abusive language in saamna editorial
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये
- युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च
- ‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी
- राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया