Fir against Congress MLA Praniti Shinde : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवानगी आंदोलनाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली. Fir against Congress MLA Praniti Shinde in Solapur For Protest Without Permission Against Central Govt
प्रतिनिधी
सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवानगी आंदोलनाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आमदार प्रणिती शिंदेंना अद्यापही मंत्रिपद नाही
आ. प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. आपल्या आक्रमक शैलीसाठी त्या ओळखल्या जातात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र प्रणिती शिंदेंसारख्या आक्रमक महिला नेत्याचा विचार अद्यापही मंत्रिपदासाठी झालेला नाही. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी त्यांना लवकरच मंत्रिमंडळात समाविष्ट करणार असल्याबाबत भाष्य केले होते. सोलापुरात विकास नसल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. सोलापूर महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी नुकताच केला होता.
Fir against Congress MLA Praniti Shinde in Solapur For Protest Without Permission Against Central Govt
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : ना बडेजाव, ना मोठेपणाचा आव, केंद्रीय कायदा मंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत लोकगीतांवर धरला ठेका, पीएम मोदींनीही केले कौतुक
- काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांनी केले अमित शहा आणि संघाचे कौतुक, म्हणाले- कट्टर विरोधक असूनही संघाने आणि शहांनी मदत केली!
- फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोझी निवडणुकीत ‘अवैध पैसा’ वापरल्याप्रकरणी दोषी, न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा
- Bhawanipur Bypoll : भाजप नेत्याच्या कारवर हल्ला, तृणमूलवर तोडफोडीचे आरोप, बनावट मतदारांवरून गोंधळ, EC ने मागवला अहवाल
- Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, म्हणाले – ‘महामार्ग कायमचे रोखू शकत नाहीत!’, केंद्राला निर्देश