• Download App
    वाझेला भेटायला आलेली महिला सांभाळायची आर्थिक व्यवहार, आखाती देशात पाठवायची वसुलीतील करोडोंची रक्कम | Financial transactions to handle the woman who came to meet Waze, crores to be sent to the Gulf countries

    वाझेला भेटायला आलेली महिला सांभाळायची आर्थिक व्यवहार, आखाती देशात पाठवायची वसुलीतील करोडोंची रक्कम

    गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून शंभर कोटींची वसुली करण्याची जबाबदारी दिलेला सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे करोडो रुपये आखातील देशात पाठवित होता. ट्रायडंट हॉटेलमध्ये त्याला भेटायला आलेली महिला त्याचे सगळे व्यवहार सांभाळायची, असे पोलीस तपासत उघड झाले आहे. Financial transactions to handle the woman who came to meet Waze, crores to be sent to the Gulf countries


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून शंभर कोटींची वसुली करण्याची जबाबदारी दिलेला सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे करोडो रुपये आखातील देशात पाठवित होता. ट्रायडंट हॉटेलमध्ये त्याला भेटायला आलेली महिला त्याचे सगळे व्यवहार सांभाळायची, असे पोलीस तपासत उघड झाले आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅँटेलिया या निवासस्थानासमोर जिलेटिन असलेली स्फोटके ठेवल्याप्रकरणी सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणातही त्याची चौकशी सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला मुंबईतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी दिली होती असा आरोप खुद्द मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.

    एनआयएकडून वाझेची कसून चौकशी सुरू आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये वाझेने रुम बुक केली होती. त्याला भेटायला एक महिला आल्याचे सीसीटीव्हीत दिसले होते. ही महिला मीरा रोड येथे राहत असून तिचे नाव मीना जॉर्ज असल्याचे उघड झाले आहे. वाझेकडे वसुलीतून दरमहा जमा होणारी करोडोंची रक्कम मीना जॉर्ज सांभाळत होती. त्यातील त्याच्या हिश्श्यातील काही रक्कम हवाल्याच्या माध्यमातून आखाती देशात पाठविल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिचा स्फोटक कार व मनसुख हिरेनच्या हत्येत सहभाग आहे का, याची माहिती घेतली जात आहे.

    वाझे हा हॉटेल ट्रायडंटमध्ये वास्तव्याला असताना त्याला भेटण्यासाठी वारंवार एक महिला आल्याचे तेथील हॉटेल व्यवस्थापनातील चौकशी व सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीतून स्पष्ट झाले होते. तपासानंतर संबंधित महिला मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये राहत असल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसांपासून हा फ्लॅट बंद होता. मूळची गुजरातची असलेली ही महिला गुरुवारी परतल्यानंतर एनआयएने तिच्याकडे चौकशी सुरू केली.



    सुमारे १३ तास तिची चौकशी केल्यानंतर पथकाने तिला ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात आणले होते. रात्री उशिरा तिला सोडल्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले. मुंबईतील विविध बार, लॉजेस, पार्लर व अन्य ठिकाणांहून जमा झालेल्या रकमेतील वाझेचा वाटा मीना हाताळत होती. त्याच्या सांगण्यावरून तिने काही रक्कम गुंतवणूक करण्याबरोबरच हवाल्याच्या माध्यमातून आखाती देशात पाठविल्याची माहिती अधिकाºयांना मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    वाझे वापरत असलेली आणखी एक मर्सिडीज एनआयएच्या पथकाने शनिवारी जप्त केली. आतापर्यंत त्याच्या एकूण आठ गाड्या जप्त केल्या आहेत. मात्र मनसुख हिरेन यांच्या हत्येशी संबंधित ऑडी व इको कारचा अद्याप शोध लागलेला नाही. आलिशान मोटारींचा शौकीन असलेल्या वाझेकडे मोटारींचा ताफाच होता. मात्र, त्यातील अनेक दुसºयांच्या नावावर होत्या. त्याच्या तीन मर्सिडीज, दोन इनोव्हा, स्कॉर्पिओ, आऊट लँडर अशा एकूण आठ गाड्या जप्त केल्या.

    Financial transactions to handle the woman who came to meet Waze, crores to be sent to the Gulf countries


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!