उठता बसता महात्मा गांधी यांचा नामजप करणाऱ्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी चंद्रपुरातील दारुबंदी हटवण्यासाठी कंबर कसली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साथ दिली. मोठ्या संघर्षाने सामाजिक कार्यकर्त्यांनी आडवी केलेली दारुची बाटली उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने अखेर उभी करुन दाखवलीच. Finally Chandrapur liquor ban lifted by Thackeray-Pawar Government despite of outcry by social activists
प्रतिनिधी
मुंबई : पंडित नेहरु यांच्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशीच चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला होता. त्यावरुन दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या राज्यभरातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र त्याची कोणतीही दखल सरकारने घेतल्याचे दिसत नाही.
वडेट्टीवार यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारी म्हणजेच चंद्रपूरातली दारूबंदी उठविण्याची अधिसूचना राज्य शासनाच्या गृहविभागाने अखेर मंगळवारी (ता. 8) काढलीच. एवढेच नव्हे तर चंद्रपुरात आता दारू दुकानेही उघडली जाणार आहेत.
- असहाय्य संतांच्या पालघरमधील माॅब लिचिंगने देशभर संतापाची लाट; उद्धव सरकार व बघे पोलिसांवर टीकेची झोड
या दारू दुकानांच्या परवान्याची कार्यवाहीसुद्धा शासनाने स्पष्ट केली. यामुळे दारूबंदी कार्यकर्ते, दारूमुळे ज्यांचे संसार उध्वस्त झाले अशा सामान्य, गरीब घरातल्या महिला यांच्या डोळ्यात पाणी आले. तर दुसरीकडे दारूविक्रीतून नफा कमावण्याच्या नुसत्या कल्पनेनेच लिकर लॉबीमध्ये आनंदाचे फवारे उडाले आहेत.
१० मार्च २०१५ नंतर चंद्रपूर जिल्ह्यातून स्थलांतरित न झालेल्या दारू दुकानदारांच्या परवान्यांचे नुतनीकरण त्यांच्या विनंतीनुसार आहे त्याच जागेवर केले जाणार आहे. यासाठी त्यांना शासनाकडे नव्याने शुल्क भरावे लागेल. दारू दुकानांच्या परवान्याची कामे विनाअडथळा, जलद पूर्ण व्हावीत याचीही काळजी ठाकरे-पवार सरकारने घेतली आहे.
त्यासाठीचे अर्ज स्वीकारण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. महामार्गालगतच्या दारू विक्रीवर निर्बंध घालणारा आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचे पालन मात्र केले जाणार आहे.
ज्या परवानाधारकांचे मृत्यू झाले मात्र ३१ मार्च २०१५ पर्यंत त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले आहे, अशांच्या वारसांच्या नावे परवाना हस्तांतरीत केला जाणार आहे. प्रचलित नियमातील तरतुदीनुसार इतर जिल्ह्यातले परवाने चंद्रपूर जिल्ह्यात स्थानांतरित करण्याचीही परवानगी शासन देणार आहे.
चालू नसलेले परवाने कार्यान्वित करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त स्वतंत्रपणे मार्गदर्शन करणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले. गृहविभागाचे उपसचिव यू. बी. अजेटराव यांनी दारू विक्रीच्या परवान्यांसंदर्भातले आदेश दिले.
Finally Chandrapur liquor ban lifted by Thackeray-Pawar Government despite of outcry by social activists
महत्त्वाच्या बातम्या
- केरळातल्या 5वीतल्या मुलीने सरन्यायाधींना लिहिले आभाराचे पत्र, CJI एन.व्ही. रमणा यांनी दिले असे उत्तर
- ‘मी भारतात पाय ठेवताच संपणार कोरोना महामारी’, रेपचा आरोपी स्वघोषित धर्मगुरू नित्यानंदचा दावा
- INTERNET DOWN : अवघ्या जगात ठप्प झाले इंटरनेट, अनेक दिग्गज कंपन्यांपासून ते यूकेची सरकारी वेबसाइट झाली बंद
- नवे लसीकरण धोरण : वाचा सविस्तर 21 जूनपासून राज्यांना कशा प्रकारे होणार केंद्राकडून लसींचे वाटप
- WATCH : मुख्यमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद, पीएम मोदींशी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, वाचा सविस्तर…