• Download App
    महिला आयपीएस अधिकाऱ्याला साजुक तुपातली बिर्याणी हवी फुकटात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश|Female IPS officer wants Biryani for free,Home Minister Dilip Walse-Patil orders probe into female IPS officer,

    महिला आयपीएस अधिकाऱ्याला साजुक तुपातली बिर्याणी हवी फुकटात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : साजुक तुपातली बिर्याणी फुकटात मागविणाऱ्या पुण्यातील एका महिला आयपीएस अधिकाºयाची ऑ डिओ क्लिप व्हायरल होत आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.Female IPS officer wants Biryani for free,Home Minister Dilip Walse-Patil orders probe into female IPS officer,

    मात्र, एका दुसऱ्या महिला पोलीस उपायुक्ताने ही ऑ डिओ क्लिप व्हायरल केली असल्याचा आरोप या आयपीएस अधिकाºयाने केला आहे.ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली महिला आयपीएस अधिकारी पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.

    त्यांचे पती आयएएस अधिकारी असून राज्यातील एका महत्वाच्या पदावर पुण्यात कार्यरत आहेत. गुरूवारपासूनच यासंदर्भातली एक फोन ऑ डिओ क्लिप ही व्हायरल झाली आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये आयपीएस अधिकारी असलेल्या डीसीपी मॅडम त्यांच्या कर्मचाऱ्या ला साजूक तुपातली बियार्णी आणण्यास सांगत आहेत.

    प्रॉन्स, चिकन बियार्णी आणि स्टार्टर्स घेऊन ये. आपलाच एरिया आहे त्यामुळे पैसे देऊ देण्याची काय गरज? पीआयला सांग वगैरे असे उल्लेख यामध्ये आहेत. हा फोन पुणे डीसीपी यांच्या नावाने व्हायरल झाला आहे.

    या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. वळसे-पाटील म्हणाले, ती व्हायरल क्लिप मी ऐकली आहे. नक्कीच गंभीर बाब आहे. आयुक्तांशी मी बोललो आहे. ते यासंदर्भातला अहवाल देतील. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईले.महिला पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाºयात झालेला हा संवाद व्हायरल झाला आहे.

    • डीसीपी : विश्रामबागमध्ये नॉनव्हेज खूप चांगली मिळते असं ऐकलं आहे.
    • कर्मचारी : हो मॅडम एसपीची साजूक तुपातली बियार्णी चांगली मिळते
    • डीसीपी: अजून..?
    • कर्मचारी : एक मटण थाळी म्हणून आहे..
    • डीसीपी : चांगलं कुठे आहे?
    • कर्मचारी : साजुक तुपातली बियार्णी
    • कर्मचारी : ते कसं मॅडम दोन- तीन प्रकार आहेत. आॅईल बिल्कुल नाही. कलर वगैरे नाही..
    • डीसीपी : हम्म…
    • डीसीपी : जी चांगली असेल ती जरा एक घेऊन आपल्या सोनावणेकडे पाठवून द्याल आणि जर काही काही याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्याल..मी सांगितलं आहे म्हणून..
    • कर्मचारी : ठीक आहे मॅडम
    • डीसीपी : मी बोलू का पीआयला?
    • कर्मचारी : नको मॅडम त्याच्या हद्दीमधे आहे..
    • डीसीपी : बरं मला एक सांग त्याच्या हद्दीमधे आहे तर आपण पैसे कशाला द्यायचे तिथे? आपल्या हद्दीत असेल तरी पैसे द्यायचे का?
    • कर्मचारी : आपण याआधी विकतच घ्यायचो..ठीक आहे पीआयंशी बोलतो
    • डीसीपी : काय? तुम्ही काय करायचे?
    • कर्मचारी : आपण कॅशच करायचो मॅडम
    • डीसीपी : कॅश म्हणजे? पे करून? तेवढं करेल तो.. त्याच्यात काय एवढं? मी सांगते, मला त्यादिवशी बोलला. आपल्या हद्दीत आहे तर त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे का? आय डोन्ट नो बाबा.
    • कर्मचारी : ठीक आहे मॅडम
    • डीसीपी : दुसरं अजून कुठे प्रॉन्स वगैरे कुठे चांगलं मिळतं? जरा तोंडाला चव येईल. आपल्या हद्दीतच विश्रामबागमध्येच.
    • कर्मचारी : हो मॅडम
    • डीसीपी : पण आॅयली नको.. टेस्ट चांगली हवी आणि मसाला वगैरे फार नको.
    • कर्मचारी : हो मॅडम. जरा व्यवस्थित पद्धतीचं आहे मटण की चिकन?
    • प्रॉन्स बियार्णी सांगू का?
    • डीसीपी : नाही रे प्रॉन्स वेगळे सांग आणि मटण बियार्णी सांग. मला चिकन आवडतं आणि साहेबांना मटण आवडतं. प्रॉन्स सुखे हवेत त्याला ग्रेव्ही नको.. प्रॉन्स फ्राय वगैरे असतात ना तशा टाईपचं. जास्त ग्रेव्ही असेल तर प्रॉन्सची चव जाते..
    • कर्मचारी : हो मॅडम. सूप वगैरे सांगू का मॅडम?
    • डीसीपी : नाही रे सुप नाही आवडत नाही..
    • कर्मचारी : सूप म्हणजे अळणी पाणी हो..
    • डीसीपी : नाही ते नाही आवडत मला नंतर कधीतरी मागवू
    • कर्मचारी : रोटी चपाती काही मागवू का?
    • डीसीपी : नाही नको ते मी घरी बनवते
    • कर्मचारी : मटण नल्ली निहारी सांगू का? टेस्ट करून बघा
    • डीसीपी : एक काम कर मटणची भाजीमधे काही तरी सांग..
    • डीसीपी : आणि बियार्णी चिकनची सांग
    • कर्मचारी : हो चालेल मॅडम

    Female IPS officer wants Biryani for free,Home Minister Dilip Walse-Patil orders probe into female IPS officer,

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य