विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील आरव हा नरबळी नसून त्याची हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ६ वर्षीय आरची त्याच्या जन्मदात्या बापानेच कौटुंबिक वादातून हत्या केली असल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव राकेश केसरे असून शाहुवाडी तालुक्यामध्ये वारणा कापशी येथील हा रहिवासी आहे. शाहूवाडी पोलिसांनी राकेशला ताब्यात घेतले आहे.
Father arrested in murder case of 6 year old boy
तपास आवरून पोलिसांना अशी माहिती मिळाली की राकेश केसरे व त्याची पत्नी यांच्यात सतत वाद होत असत. या कारणामुळे खून झाला असावा असे पोलिसांना वाटले. पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर राकेशने खून केला असल्याचे कबूल केले. ५ ऑक्टोबर रोजी त्याच्या मुलाचा मृतदेह हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत आढलून आला. त्यामुळे हा नरबळी असल्याचे सर्वांना वाटले होते.
कोल्हापूर मध्ये पुन्हा विकृत मानसिकतेचे कृत्य, भटक्या कुत्र्यांवर ओतले ऍसिड
पत्नी शेजारच्या घरी श्राद्धसाठी गेली असता राकेशने आरवला तिला बोलवून आणायला सांगितले. परंतु आरवने नकार दिला. त्यामुळे आरवचा राग येऊन राकेशने त्याला हातोडा फेकून मारला व बेशुद्ध अवस्थेत असतानाच त्याची गळा आवळून हत्या केली. या हस्ते मागचं नेमकं कारण कळल्यानंतर पोलीसही हैराण झाले. राकेश बांधकाम स्थळी काम करीत असतात त्याची साधनाची ओळख झाली. त्यानंतर या दोघांचा विवाह होऊन त्यांना रुद्र नावाचा पहिला मुलगा झाला. दुसरा मुलगा आरवचा चेहरा वेगळाच आहेत या संशयाने राकेशने त्याला संपवले. यातूनच हे स्पष्ट झाले की आरव हा नरबळी नसून त्याची हत्या केली गेली होती.
Father arrested in murder case of 6 year old boy
महत्त्वाच्या बातम्या
- रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप ; म्हणाल्या- ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे “
- महाराष्ट्रातल्या 60 कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा; सध्या छापे पवारांशी संबंधित साखर कारखान्यांवर
- ED Raid : अजित पवार काहीही लपवत नाहीत ; जयंत पाटलांनी केली अजित पवारांची पाठराखण
- मी आर्थिक शिस्तीचा माणूस; माझ्या बहिणींशी संबंधित मालमत्तांवर छापे ही राजकीय सूडबुद्धी; अजितदादांची संतप्त प्रतिक्रिया