• Download App
    Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर फॅशन टीव्हीचा खुलासा - आम्ही पार्टी आयोजित केली नाही, क्रूझवरील प्रवाशांशी कोणताही संबंध नाही!|fashion tv statement on mumbai cruise drugs case we not responsible for unfortunate events that occured over past few days in mumbai

    Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर फॅशन टीव्हीचा खुलासा – आम्ही पार्टी आयोजित केली नाही, क्रूझवरील प्रवाशांशी कोणताही संबंध नाही!

    क्रूझ ड्रग्जप्रकरणी आता फॅशन टीव्हीचाही खुलासा आला आहे. क्रुझवर जे घडले त्याच्याशी कंपनीचा काहीही संबंध नसल्याचे फॅशन टीव्हीचे म्हणणे आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की फॅशन टीव्हीने पार्टीचे आयोजन केले नाही आणि ते केवळ प्रायोजक होते. त्यामुळे क्रूझवर बसलेल्या प्रवाशांशी कंपनीचा काहीही संबंध नाही. फॅशन टीव्हीने याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे सांगितले आहे.fashion tv statement on mumbai cruise drugs case we not responsible for unfortunate events that occured over past few days in mumbai


    प्रतिनिधी

    मुंबई : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आता फॅशन टीव्हीचाही खुलासा आला आहे. क्रुझवर जे घडले त्याच्याशी कंपनीचा काहीही संबंध नसल्याचे फॅशन टीव्हीचे म्हणणे आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की फॅशन टीव्हीने पार्टीचे आयोजन केले नाही आणि ते केवळ प्रायोजक होते. त्यामुळे क्रूझवर बसलेल्या प्रवाशांशी कंपनीचा काहीही संबंध नाही. फॅशन टीव्हीने याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे सांगितले आहे.

    फॅशन टीव्हीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कासिफ खान हा क्रूझ ड्रग्ज पार्टीचा आयोजक नव्हता आणि त्यामुळे त्याचा क्रूझवरील प्रवाशांशी थेट संबंध नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अशा वर्तनाचे समर्थन करणार नाही. या प्रकरणाच्या तपासात संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही आमचे पूर्ण सहकार्य देऊ.



    क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक सातत्याने आरोप करत आहेत. नवाब मलिक म्हणाले की, क्रूझमधील दाढीवाला कासिफ खान होता. नवाब मलिक यांनी क्रूझवरील कासिफच्या पार्टीचा व्हिडिओही जारी केला आहे. नवाब मलिक कासिफवर ड्रग्ज पार्टी, सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप करत आहेत. कासिफ हा फॅशन टीव्हीचा इंडिया प्रमुख आहे.

    एनसीबीच्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला वारंवार ‘बनावट’ ठरवणारे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी क्रूझ पार्टीच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही असा सवाल केला. क्रूझ पार्टीचे आयोजक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा ‘मित्र’ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

    त्यांनी विचारले की, “परवानगीशिवाय एवढी मोठी पार्टी कशी आयोजित करण्यात आली? फॅशन टीव्हीचे इंडिया हेड आणि समीर वानखेडेचे मित्र काशिफ खान यांच्यावर कारवाई का झाली नाही?” वानखेडे आणि काशिफ खान यांच्यातील संबंधांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

    fashion tv statement on mumbai cruise drugs case we not responsible for unfortunate events that occured over past few days in mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!