प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रनिर्माण संस्कारासाठी कुटुंब, शाळा, मंदिर ही प्रभावी आणि महत्वपूर्ण केंद्रे असल्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी प्रतिपादन केले. “कुटुंब प्रबोधन गतीविधी” नाशिकरोड गटाच्या वतीने धामणकर सभागृहात दिपावलीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.Family is an effective center for nation building rites: Dilip Kshirsagar
कुटुंबात,नातेवाईकांमध्ये,शेजारी मित्र परिवारांमध्ये सातत्याने संवाद व सहकार्याची भावना महत्वाची असून कुटुंब प्रबोधनातुन राष्ट्रहिताची भावना अधिक बळकट होण्यास मदत होत असते. आठवड्यातील एक दिवस तरी सर्व कुटुंबाने एकत्रित भोजन करून संवादातुन राष्ट्र हिताच्या दृष्टीने चर्चा करावी. समाजाचे आपणही देणे लागत असून व्यक्ती, कुटुंब समाजापासूनच राष्ट्रहिताची भावना व प्रेम निर्माण करणे शक्य होत असते.
ज्या कुटुंबात तीन पिढ्या कार्यरत आहेत अशा कुटुंबात उत्तम संस्कार केंद्र असते. परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पध्दत लोप पावत असली तरी स्नेह व सहकार्य महत्वाचे आहे. गरजूला वेळेवर मदत व सहकार्य करा हाच कुटुंबप्रबोधनाचा मुख्य हेतू आहे. व्यष्टी, सृष्टी, समष्टीच्या माध्यमाथुन परमेष्टीकडे जाण्याचा मार्ग संस्कारातून होत असतो. अहंकार असत्य अधर्म अभिमान यासारख्या बाबींवर नियंत्रण आवश्यक असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्रदीप केतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. नाशिकरोड गट संयोजक डाॅ. साहेबराव कासव यांनी प्रास्ताविक केले. विवेक बकरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर रिया खालकर व नूपुर डान्स अॅकॅडमीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. राम बागूल याने पद्य सादर केले.
जठार यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पूजा अष्टेकर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी जेलरोड उपनगर, सावरकर नगर, मुक्तीधाम, एकलहरे गटातील स्वयंसेवक कुटुंबासह उपस्थित होते. उपस्थितांना अल्पोपहार दिवाळी फराळ देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सुरेश जठार, दिपक साबळे, शुभम कीर्तने यांचे सहकार्य लाभले.
Family is an effective center for nation building rites: Dilip Kshirsagar
महत्त्वाच्या बातम्या
- अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”
- दिवाळी स्पेशल; “करे नारी से खरीदारी”; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!!
- भाजपचा ममता यांना सवाल ; आम्ही पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले, तुम्ही ‘ कर ‘ कधी कमी करणार दीदी?