सासरच्यांकडून होणारा छळ असह्य होऊन २१ वर्षीय नवविवाहितेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. मात्र, शवविच्छेदनात विषप्राशन केल्याचे उघड होऊ नये म्हणून सासरच्यांनी तिला कोरोना असल्याचा बनाव रचला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट रिपोर्टही बनविला.Fake report of corona to cover up suicide committed by Sune due to persecution, shocking incident in Beed district
प्रतिनिधी
बीड: सासरच्यांकडून होणारा छळ असह्य होऊन २१ वर्षीय नवविवाहितेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. मात्र, शवविच्छेदनात विषप्राशन केल्याचे उघड होऊ नये म्हणून सासरच्यांनी तिला कोरोना असल्याचा बनाव रचला.
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट रिपोर्टही बनविला.बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे हा प्रकार घडला. विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये व शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरकडील मंडळींनी तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला.
मात्र माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे हा बनाव फसला असून, याप्रकरणात पतीसह सासरच्या चौघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पूजा गणेश रायकर (वय २१, रा. धनगर जवळका ता. पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पूजाचे माहेर अंबाजोगाईचे आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांच्या फियार्दीनुसार पूजाचा विवाह दोन वषार्पूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झाला होता. गणेश पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे.
लग्नानंतर सुरुवातीचे दीड वर्ष चांगले गेले. त्यानंतर तुला अजूनही मुलबाळ होत नाही असे पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे सतत तिला हिणवू लागले. कार घेण्यासाठी माहेराहून अडीच लाख रुपये घेऊन ये असा तगादा तिच्यामागे लावला.
सहा महिन्यांपूर्वी पूजाच्या आई-वडिलांनी आर्थिक परिस्थिती बिकट असून आणखी एका मुलीचे लग्न करायचे बाकी आहे, पैसे आल्यास आम्ही तुम्हाला गाडीसाठी पैसे देऊ, असे पूजाच्या सासरच्यांना सांगितले.
एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी धनगरजवळका येथे परतला. तिथे आल्यावर त्याने आई-वडिलांच्या मदतीने कारच्या पैशासाठी पूजाला सतत मारहाण, शिवीगाळ करून तिचा छळ सुरु केला, तिला उपाशी ठेवू लागले.
सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने बुधवारी (१९ मे) दुपारी तीन वाजता वडिलांना शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिने सॅनिटायजर प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर मंगळवारी (२५ मे) रात्री आठ वाजता गणेशचा मावस भाऊ नामदेव हरिभाऊ सुडके हा रुग्णवाहिका घेऊन तिथे आला. पुण्यात माझी लॅब असल्याने खासगी रुग्णालयात माझे संबंध आहेत,
उपचार चांगले होतील असे म्हणत त्याने पुजाला नेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी (२६ मे) पहाटे ४ वाजता पूजाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड होईल हे नामदेवच्या लक्षात आले. नियमानुसार कोरोना रुग्णांचे शवविच्छेदन करत नाहीत.
त्यामुळे शवविच्छेदन टाळण्यासाठी नामदेवने स्वत:च्या लॅबमध्ये पूजाची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा खोटा लेखी अहवाल रुग्णालयात सादर केला.
परंतु, पूजाच्या माहेरच्या लोकांना हा अहवाल मान्य नसल्याने त्यांनी दुसरीकडे पूजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पूजाचा मृतदेह नातेवाईकांना मिळाला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
Fake report of corona to cover up suicide committed by Sune due to persecution, shocking incident in Beed district
महत्त्वाच्या बातम्या
- Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्यात 189 पदांवर भरती, 2.5 लाखांपर्यंत मिळेल वेतन
- Monsoon Updates : नैर्ऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराकडे वळला, 31 मेपर्यंत केरळला पोहोचण्याची शक्यता
- CBSE 12th Board Exam 2021 : बारावीची परीक्षा रद्द होणार की नाही, सोमवारी येणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- Corona Cases In India : देशात 44 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण आढळले, 24 तासांत 1.86 लाख रुग्णांची नोंद
- GST Council Meeting : ८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक आज बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता