• Download App
    सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा फडणीसांकडून निषेध; पण उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल!! Fadnis condemns Rahul Gandhi for insulting Savarkar

    सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा फडणीसांकडून निषेध; पण उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल!!

    प्रतिनिधी

    मुंबई : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाची टीका केली. बलवानांसमोर मान झुकवायची ही वीर सावरकरांची विचारधारा असल्याचे बेछूट वक्तव्य राहुल गांधी केले. राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप घेत, आता सगळीकडून निषेध केला जात आहे. Fadnis condemns Rahul Gandhi for insulting Savarkar

    या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस बरोबर सत्तेत असताना तुमची मजबुरी होती, मात्र आता सत्ता गेल्या नंतर देखील तुम्ही शांत का?, असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.


    सलमान खुर्शीद यांच्याकडून राहुल गांधींची रामाशी तुलना; रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांचे खडावा पूजन


    अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एक गोष्ट विचारायची आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे आणि राहुल गांधींनी आज पुन्हा सावरकरांचा अपमान केला आहे. मागच्या काळात काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळे तुमची मजबुरी होती.

    तुम्हाला सरकार चालवायचे होते. त्यामुळे राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करायचे तरी तुम्ही मूग गिळून बसायचा. पण आता सत्ता गेल्यानंतरही तुमची नेमकी मजबुरी काय आहे? आता तुम्ही ज्यांच्या गळाभेटी घेतात, ते रोज सावरकरांचा अपमान करतात. तरी तुम्ही गप्प का बसता?? सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो.

    Fadnis condemns Rahul Gandhi for insulting Savarkar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस