वृत्तसंस्था
नागपूर : ‘कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते’ असं वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना अखेर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल म्हणून ते तसे बोलले असतील’, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. Fadnavis’s slpa answer to Gaikwad
संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपल्या शैलीत हे उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, ‘कसं आहे, संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल. त्यामुळे त्यांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेतली असावी. त्यांना माझ्या तोंडात कोरोना विषाणू टाकायचे असेल तर त्यांनी नीट मास्क व हॅन्डग्लोस घालावेत. कारण रात्रीची घेणाऱ्यांसाठी कोरोना विषाणू अधिक घातक असतो.
बुलडाण्यात भाजप-शिवसैनिक भिडले
शिवसैनिकांचा आरोप आहे की, भाजपाचे पदाधिकारी आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. नेते विजयराज शिंदे यांना खाली पाडून मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.
पोलिसांनी दोन्ही गटाना वेगळे केले.
Fadnavis’s slpa answer to Gaikwad
महत्वाच्या बातम्या वाचा
- वाढत्या कोरोनाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका, आता अभियांत्रिकीची ‘जेईई मेन्स’ही पुढे ढकलली
- महाराष्ट्रात तरुणाईला ग्रासले कोरोनाने, ३१ ते ४० वयोगटाला सर्वाधिक संसर्ग
- कोरोना रुग्णांसाठी तुळजाभवानी देवस्थानकडून ३०० बेडचे हॉस्पिटल, अन्य देवस्थानांकडे आता लक्ष
- “दिल्लीत हुजरेगिरी ते महाराष्ट्रद्रोही”… प्रदेश काँग्रेसच्या गडकरी, जावडेकर, गोयल, आठवलेंसह मराठी केंद्रीय मंत्र्यांवर दुगाण्या
- पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या सभा भारतीयांच्या जीवापेक्षा मोठा आहेत का? येचुरी यांचा खडा सवाल